अनुष्का लोहिया इंडियन फॉरेस्ट सर्विसेस परीक्षेत भारतात चौथी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2023 05:06 PM2023-07-01T17:06:06+5:302023-07-01T17:06:15+5:30
स्थापत्य अभियंता असलेल्या अनुष्काने वनक्षेत्र करिअर म्हणून निवडत मिळवले यश
अंबाजोगाई : युपीएससी अंतर्गत घेण्यात येणाऱ्या इंडियन फॉरेस्ट सर्विसेस परीक्षेत अंबाजोगाई येथील अनुष्का अभिजित लोहिया हीने भारतात चौथ्या क्रमांकावर येण्याचा मान मिळवला आहे.
अंबाजोगाई येथील अनुष्का ही प्रख्यात हृद्यरोग तज्ञ डॉ. शुभदा आणि प्रा. अभिजित यांची मुलगी आहे. अनुष्का सिव्हील इंजिनिअर आहे. त्यानंतर तिने वन क्षेत्र करियर म्हणून निवडले. युपीएससी अंतर्गत घेण्यात येणाऱ्या इंडियन फॉरेस्ट सर्विसेससाठी तिने जोरदार तयारी केली. या परीक्षेचा निकाल आज लागला असून अनुष्काने भारतात चौथा क्रमांक पटकावला आहे.
शालेय जीवनापासूनच अभ्यासासोबतच अनुष्कास शास्त्रीय नृत्य, फोटोग्राफी, चित्रकला, पर्यटनाचा छंद आहे. तिने चंद्रावर शॉर्ट फिल्म बनवली असून त्यास आंतरराष्ट्रीय नामांकन मिळाले आहे. अनुष्काच्या युपीएससीतील यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.