अप्पा, तुमचा वाढदिवस उत्सव असायचा, आज जयंती म्हणावं लागतंय याचं दुःख: धनंजय मुंडे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 11:40 AM2022-12-12T11:40:33+5:302022-12-12T11:41:41+5:30
धनंजय मुंडे गोपीनाथ गडावर नतमस्तक, जयंतीनिमित्त केले अभिवादन
परळी (बीड) - 'हॅलो, मी गोपीनाथ मुंडे बोलतोय...' अप्पा या तुमच्या वाक्याचं वजन मीच काय अनेकांनी अनुभवलंय, तुमचा वाढदिवस म्हणजे उत्सव असायचा आमचा! आता जयंती म्हणावं लागतं याचं दुःख आहे, पण तुम्ही आमच्यात आहेत, तुम्ही दिलेल्या शिकवणीतून! जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन अप्पा... अशा शब्दात आ. धनंजय मुंडे यांनी लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.
धनंजय मुंडे हे आज सकाळी परळी तालुक्यातील गोपीनाथ गड या स्व. मुंडे साहेबांच्या स्मृतिस्थळी नतमस्तक होऊन पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. यावेळी त्यांनी स्व. मुंडे साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.
'हॅलो, मी गोपीनाथ मुंडे बोलतोय...' अप्पा या तुमच्या वाक्याचं वजन मीच काय अनेकांनी अनुभवलंय, तुमचा वाढदिवस म्हणजे उत्सव असायचा आमचा! आता जयंती म्हणावं लागतं याचं दुःख आहे, पण तुम्ही आमच्यात आहेत, तुम्ही दिलेल्या शिकवणीतून!विनम्र अभिवादन अप्पा... #RememberingGopinathraoMundeSahebpic.twitter.com/WFCSvGQNot
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 12, 2022
धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटर हँडल वरून भावनिक पोस्ट करत गोपीनाथराव मुंडे साहेबांची प्रेरणा व विचार हे लोककल्याणकारी होते, त्यांच्या स्मृती सतत आपल्याला प्रेरणा देत राहतील असेही म्हटले आहे.