बँकेतील गर्दी टाळण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:38 AM2021-09-15T04:38:48+5:302021-09-15T04:38:48+5:30
----------- कोरोना लस घेऊन सुरक्षित व्हा अंबाजोगाई : तालुक्यात सध्या कोरोनापासून रक्षण व्हावे. यासाठी नागरिकांची लसीकरण मोहीम युद्धस्तरावर राबविण्यात ...
-----------
कोरोना लस घेऊन सुरक्षित व्हा
अंबाजोगाई : तालुक्यात सध्या कोरोनापासून रक्षण व्हावे. यासाठी नागरिकांची लसीकरण मोहीम युद्धस्तरावर राबविण्यात येत आहे. संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा धोका गृहीत धरता प्रत्येकाने लस घेऊन कोरोनापासून सुरक्षित व्हावे, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बालासाहेब लोमटे यांनी केले.
------------
डिझेलचे दर कमी करण्याची मागणी
अंबाजोगाई : डिझेलच्या दरात गेल्या काही महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. यामुळे शेतशिवारांमधून वाहनांव्दारे पिकलेला शेतमाल शहरात आणण्याकरिता अधिकचा खर्च लागत आहे. ही बाब लक्षात घेता डिझेलचे दर कमी करावेत, अशी मागणी शेतकरी इस्माईल शेख यांनी केली आहे.
------------------------------------
पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी
अंबाजोगाई : शहरात असणाऱ्या विविध शासकीय कार्यालयात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अद्याप करण्यात आलेली नाही. यामुळे विविध विभागांमधील कर्मचाऱ्यांना व कार्यालयात विविध कामासाठी येणाऱ्या नागरिकांना विकतचे पाणी प्यावे लागत आहे. याकडे लक्ष पुरवून शुद्ध पाण्याची सोय उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब कसबे यांनी केली आहे.
------------------------------------
रस्त्यावरील दिवे दुरुस्तीची मागणी
अंबाजोगाई : तालुक्यात महिनाभरापासून मोठा पाऊस सुरू आहे. पावसाळ्यात रात्रीच्या सुमारास विजेची आवश्यकता भासते. ही बाब लक्षात घेऊन खेडेगावातील काही ठिकाणचे नादुरुस्त असलेले पथदिवे विनाविलंब दुरुस्त करावेत, अशी मागणी होत आहे.