प्रवाशांना मास्क वापरण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:38 AM2021-08-25T04:38:35+5:302021-08-25T04:38:35+5:30

अंबाजोगाई : एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गर्दी हल्ली वाढलेली आहे. दरम्यान, प्रवाशांनी प्रवासादरम्यान तोंडाला मास्क किंवा गमचा वापर ...

Appeal to passengers to wear masks | प्रवाशांना मास्क वापरण्याचे आवाहन

प्रवाशांना मास्क वापरण्याचे आवाहन

Next

अंबाजोगाई : एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गर्दी हल्ली वाढलेली आहे. दरम्यान, प्रवाशांनी प्रवासादरम्यान तोंडाला मास्क किंवा गमचा वापर करावा, अशा सूचना वारंवार देण्यात येत आहेत. प्रवाशांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन आगारप्रमुख नवनाथ चौरे यांनी केले आहे.

----------------------------

‘धूरमुक्त’ अभियानाला बसली खीळ

अंबाजोगाई : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत सातत्याने वाढच होत आहे. यामुळे सर्वसामान्य कुटुंबांचे आर्थिक बजेट विस्कळित बनले आहे. यासह उज्ज़्वला योजनेअंतर्गत गॅस मिळालेल्या बहुतांश महिलांनी दरवाढीमुळे गॅसचा वापर बंद केल्याने धूरमुक्त अभियानाला खीळ बसली आहे.

----------------------------

ऑनलाईन शिक्षणात इंटरनेटचा खोडा

अंबाजोगाई : ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी ॲन्ड्रॉईड मोबाईलची गरज आहे. तो विकत घेण्यासाठी ऐपत नसतानाही अनेकांनी पदरमोड करून मोबाईल विकत घेतला आणि त्यात सीमकार्ड घालून शिक्षण सुरू केले. मात्र वारंवार नेटवर्क जाणे, गती न मिळणे यासह अन्य अडचणींमुळे शिक्षणात खोडा निर्माण होत असल्याचे दिसत आहे.

--------------------------------

एटीएममध्ये सुरक्षा रक्षकांची गरज

अंबाजोगाई : शहरातील विविध भागामध्ये बँकांनी एटीएम सेवा सुरू केली आहे. ग्राहक याचा लाभसुद्धा घेत आहेत. मात्र काही ठिकाणी एटीएमच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षकच नसल्याचे दिसून येत आहे. भविष्यात काही धोका होऊ नये. यासाठी सुरक्षा रक्षक नियुक्त करावेत, अशी मागणी केली जात आहे.

------------------------

घरगुती गॅसची दरवाढ कमी करा

अंबाजोगाई : केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरची दरवाढ सुरूच ठेवल्याने दिवसेंदिवस महागाईचा आलेख गगनाला भिडत चालला आहे. त्यामुळे अनेकांचे आर्थिक बजेट बिघडले आहे. घरगुती गॅस सिलिंडरची दरवाढ कमी करणे गरजेचे आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

--------------------------

रेन हार्वेस्टिंगबाबत जनजागृतीची गरज

अंबाजोगाई : दरवर्षी तालुक्याला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. मात्र तरीसुद्धा रेन हार्वेस्टिंगबाबत जनजागृती करण्यात येत नाही. त्यामुळे प्रशासनाने याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. सर्वांनी रेन हार्वेस्टिंगचा उपक्रम आपल्या घरी केल्यास मोठ्या प्रमाणात पाणी जमिनीत मुरेल आणि पाणी पातळी वाढण्यास मदत होईल.

Web Title: Appeal to passengers to wear masks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.