दिसला रस्त्यावर की धरला टेस्टिंगसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:14 AM2021-05-04T04:14:58+5:302021-05-04T04:14:58+5:30
: १३ हजारांचा दंड वसूल शिरूर कासार : शिथिलता वेळ संपली तरी रस्त्यावरची वर्दळ कमी होत नव्हती. कामाशिवाय ...
: १३ हजारांचा दंड वसूल
शिरूर कासार : शिथिलता वेळ संपली तरी रस्त्यावरची वर्दळ कमी होत नव्हती. कामाशिवाय बाहेर पडू नका असे वारंवार केलेल्या आवाहनाला कुणीच जुमानत नसल्याने अखेर सोमवारी नगर पंचायत व आरोग्य विभागाने शहरातील कोर्टाच्या चौकात तळ ठोकला. रस्त्याने विनाकारण फिरणारा दिसताच त्याची अँटिजेन चाचणी करण्याचा धडाका सुरू केला. ३१ फिरस्त्यांची तपासणी केली. सुदैवाने कुणीच बाधित निघाले नाही. आता तरी कामाशिवाय रस्त्यावर फिरणारे घरात बसतील असे बोलले जाते. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक गवळी व नगरपंचायतीचे मुख्याधिकारी किशोर सानप यांनी कोर्ट चौकात ही मोहीम राबविली. मदतीला पोलीस होतेच.
तालुक्यात बाधित रुग्ण संख्या वाढतीच निघत असून त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यात रस्त्यावरच तपासणी सुरू केल्या. तशाच पद्धतीने शिरूरमध्येदेखील तपासणी मोहीम सुरू केली आहे. ही तपासणी मोहीम अशीच सुरू ठेवली जाईल असे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले .
विनामास्क फिरणाऱ्यांना दंड
सोमवारी शिरूर कासार येथील कोळवाडी चौकात रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांची जागेवर अँटिजेन चाचणी तर केलीच शिवाय विना मास्क फिरणाऱ्या ६५ जणांकडून नगरपंचायतीने १३ हजारांचा दंड वसूल केल्याची माहिती मुख्याधिकारी किशोर सानप यांनी दिली.
===Photopath===
030521\vijaykumar gadekar_img-20210503-wa0054_14.jpg