स्वाराती रुग्णालयात एक हजार खाटा मंजूर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:32 AM2021-03-19T04:32:50+5:302021-03-19T04:32:50+5:30

अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात दिवसागणिक दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहेत. परिणामी सध्याच्या ५१८ खाटा ...

Approve one thousand beds in Swarati Hospital | स्वाराती रुग्णालयात एक हजार खाटा मंजूर करा

स्वाराती रुग्णालयात एक हजार खाटा मंजूर करा

Next

अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात दिवसागणिक दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहेत. परिणामी सध्याच्या ५१८ खाटा कमी पडत असून जमिनीवर गादी टाकून रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. ही विदारक परिस्थिती दूर करण्यासाठी स्वाराती रुग्णालयासाठी तातडीने एक हजार खाटा मंजूर करून त्यानुसार आवश्यकतेप्रमाणे डॉक्टर, नर्स, तंत्रज्ञ व इतर कर्मचाऱ्यांची पदे भरण्याची मागणी केज विधानसभा मतदार संघाच्या आ.नमिता अक्षय मुंदडा यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली आहे.

स्वाराती रुग्णालयातील विविध अडचणी संदर्भात बुधवारी आ. मुंदडा यांनी ना. अमित देशमुख यांची भेट घेऊन चर्चा केली.

अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयावर बीडसह तीन जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्ण अवलंबून आहेत. वाढत्या रुग्ण संख्येमुळे स्वाराती रुग्णालयावर प्रचंड ताण येत आहे. प्रत्येक वार्ड रुग्णांनी खचाखच भरला असून डॉक्टर्स, नर्सची संख्या कमी पडत आहे. त्यामुळे रुग्णालयासाठी मंजूर खाटा वाढविणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच, रुग्णालयातील शल्य चिकित्सा विभागाच्या इमारतीवर आणखी एक मजला बांधणे आवश्यक असून त्यासाठी मंजुरी आणि निधी द्यावा अशी मागणीही आ. मुंदडा यांनी केली. रुग्णालयात डायलेसिस मशीन कार्यान्वित आहेत, परंतु त्यासाठी तज्ञ डॉक्टर, तंत्रज्ञ उपलब्ध नाहीत. या विभागाच्या गरजेनुसार पदे भरण्यात यावीत. रुग्णालयासाठी कार्डियाक रुग्णवाहिका अत्यावश्यक असून ती द्यावी. रुग्णालयात परिसरातील ड्रेनेज व्यवस्था खूप जुनी झाली असल्याने नव्या ड्रेनेज व्यवस्थेसाठी त्वरित अंदाजपत्रक तयार करून त्यास मंजुरी द्यावी. अंबाजोगाई परिसरातील कर्करोग रुग्णांना उपचारासाठी औरंगाबाद, पुणे, मुंबईला जावे लगते. या रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी स्वाराती रुग्णालयातील कोबाल्ट युनिट पुन्हा सुरु करावे, अशा मागण्या आ. मुंदडा यांनी यावेळी केल्या.

कॅथलॅबसाठी निधी द्या

हृदयविकाराच्या रुग्णांची मोठी संख्या असतानाही अंबाजोगाई व परिसरात कॅथलॅबची सोय नाही. येथील रुग्णांना आर्थिक क्षमता नसताना देखील कॅथलॅबसाठी नाईलाजाने मोठ्या शहरात जाऊन महागडे उपचार करून घ्यावे लागता. त्यामुळे स्वाराती रुग्णालयातच अद्यावत कॅथलॅब उभारण्यात यावी. त्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आ. मुंदडांनी केली आहे.

===Photopath===

180321\avinash mudegaonkar_img-20210318-wa0070_14.jpg

===Caption===

स्वाराती रुग्णालयातील उपचार  सुविधांबाबत आ. नमिता मुंदडा यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांना भेटून चर्चा केली.

Web Title: Approve one thousand beds in Swarati Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.