एप्रिल वाढविणार जिल्ह्याचा ताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:33 AM2021-04-01T04:33:44+5:302021-04-01T04:33:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यात उन्हाचे चटके आता चांगलेच बसू लागले आहेत. मागील आठवडभराचा आढावा घेतला असता तापमानाचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात उन्हाचे चटके आता चांगलेच बसू लागले आहेत. मागील आठवडभराचा आढावा घेतला असता तापमानाचा आलेख झपाट्याने वर चढत आहे. उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असून थोडेही चालले की अंगातून घाम निघत आहे. मार्च महिन्यातच चटके वाढल्याने एप्रिल महिना जिल्ह्यासाठी चांगलाच ताप वाढविण्याची शक्यता आहे.
आगोदरच कोरोनामुळे लॉकडाऊन आहे. थोड्याफार शिथील वेळेत लोक घराबाहेर पडत आहेत. परंतु सकाळी ९ वाजेपासूनच उन्हाचे चटके बसायला सुरूवात झाली आहे. लोक १२ वाजेपर्यंतच खरेदी करून घर जवळ करीत आहेत. तर काही लोक छत्री आणि रूमालाचा वापर करून उन्हापासून बचाव करीत असल्याचे दिसत आहे. उन्हाचे चटके बसत असल्याने लोकही घराबाहेर पडणे टाळत आहेत. त्यामुळे रस्त्यांवर शुकशुकाट असल्याचे बहुतांश ठिकाणी पहावयास मिळाले.
रस्त्यांवर शुकशुकाट, लहान मुले, वृद्ध घरातच
n आठवडारभरात दिवसेंदिवस उन्हाचे चटके वाढत गेल्याने रस्त्यांवर शुकशुकाट पहायला मिळत आहे. लहान मुले, वृद्ध घराबाहेर पडण्यास टाळत आहेत.
n मागील सात दिवसांचा आढावा घेतला असता कमाल तापमान ३५ वरून ४१ वर पेाहचले आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे.
बुधवारचे रेकॉर्ड
n मागील आठवड्यात २४ मार्च रोजी कमाल तापमान ३५ तर किमान तापमान २२ होते. त्यानंतर तापमानाचा आलेख वाढत गेला.
n बुधवारी कमाल तापमान ४१ तर किमान २४ होते. मागील आठवडाभरातील हा तापमानाचा रेकॉर्ड राहिल्याचे दिसते.