स्वस्त धान्य विक्रेत्याची मनमानी, शिधापत्रिकाधारकांची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:31 AM2021-05-22T04:31:19+5:302021-05-22T04:31:19+5:30
आष्टी तालुक्यातील निमगांव चोभा ता. आष्टी येथील स्वस्त धान्य दुकानात राज्य शासनाच्या निर्णयानुसार दर्शनी भागात सुस्पष्ट सूचना फलक ...
आष्टी तालुक्यातील निमगांव चोभा ता. आष्टी येथील स्वस्त धान्य दुकानात राज्य शासनाच्या निर्णयानुसार दर्शनी भागात सुस्पष्ट सूचना फलक वेळापत्रक, किरकोळ विक्रीचे मुल्य, लावले जात नाहीत. शिधापत्रिकाधारकांना धान्य खरेदी पावती मिळत नाही. शासन नियमाप्रमाणे सर्व अन्न धान्य प्रमाणात उपलब्ध केले जात नाही, असे निवेदन नायब तहसिलदार प्रदीप पाडुळे यांना देण्यात आले आहे. स्वस्त धान्य दुकान ग्रामपंचायत व नागरिकांना सुचना न देता अनिधिकृतपणे एका जागेवरुन दुसऱ्या जागी हलवले जाते. स्वस्त धान्य दुकानावर तक्रारवही उपलब्ध केली जात नाही. कोरोनासारख्या महामारीच्या काळात दुकानदाराकडून नागरिकांची अडवणूक होत असल्याने योग्य चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी निमगाव चोभा येथील योगेश थेटे, एकनाथ पवार, मनोहर गाडे, विजय शेळके, सचिन जानावळे, आण्णा जानावळे, ऋषी सरोदे, गणेश सरोदे, महेश मडके, किरण सरोदे आदी ग्रामस्थांनी केली आहे.