वाकडी येथील घटनेच्या निषेधार्त माजलगावात अर्धनग्न आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 04:55 PM2018-06-19T16:55:14+5:302018-06-19T16:55:14+5:30
जामनेर तालुक्यातील वाकडी येथील अनुसूचित जातीच्या मुलांना मारहाणीच्या घटनेच्या निषेधार्थ मातंग बचाव कृती समितीच्यावतीने आज सकाळी तहसील कार्यालयावर अर्धनग्न आंदोलन करण्यात आले.
माजलगाव (बीड ) : जामनेर तालुक्यातील वाकडी येथील अनुसूचित जातीच्या मुलांना मारहाणीच्या घटनेच्या निषेधार्थ मातंग बचाव कृती समितीच्यावतीने आज सकाळी तहसील कार्यालयावर अर्धनग्न आंदोलन करण्यात आले.
जामनेर तालुक्यातील वाकडी या गावी मागील आठवड्यात अनुसूचित जातीच्या दोन मुलांना विहीरीत पोहोण्याच्या कारणावरून नग्न करून मारहाण करण्यात आली. या घटनेचा विडिओ व्हायरल झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात वादळ उठले. याच्या निषेधार्त मातंग समाज बचाव कृती समितीतर्फे आज सकाळी आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी अर्धनग्न अवस्थेत तहसीलवर मोर्चा काढला. तहसीलदार झम्पलवाड यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. आंदोलनात नेतृत्व भास्कर शिंदे यांनी केले तर रणजित कसबे, प्रदीप तांबे, गुलाब ढगे, धनु पाडुळे, विजय वाघमारे, प्रभू घोरपडे, अजय वाघमारे आदींनी सहभाग घेतला.