या बसेस आहेत की गळक्या पत्र्यांचे घर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:35 AM2021-08-23T04:35:04+5:302021-08-23T04:35:04+5:30

पावसाळ्यात प्रवाशांची उडतेय तारांबळ बीड : कोरोनामुळे एसटी बसेसची चाके थांबली होती. मात्र, आता निर्बंध शिथिल झाल्याने लालपरी पुन्हा ...

Are these buses or a house of leaking leaves? | या बसेस आहेत की गळक्या पत्र्यांचे घर?

या बसेस आहेत की गळक्या पत्र्यांचे घर?

Next

पावसाळ्यात प्रवाशांची उडतेय तारांबळ

बीड : कोरोनामुळे एसटी बसेसची चाके थांबली होती. मात्र, आता निर्बंध शिथिल झाल्याने लालपरी पुन्हा रस्त्यावर धावू लागली आहे. दरम्यान, बसेसच्या दुरुस्तीची कामे वाढली असून काही गाड्यांच्या छतातून पाणी ठिबकत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.

जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाचे आठ आगार आहेत. या आगारांच्या ताफ्यात एकूण ५४७ इतक्या बसेस आहेत. निर्बंध शिथिलतेनंतर विविध प्रमुख मार्गांवरील बसेस सुरु झाल्या आहेत. मात्र, अजूनही खेड्यापाड्यांतील बसफेऱ्या बंद आहेत. ५४७ पैकी ४२० बसेस सध्या रस्त्यावर धावत आहेत. उर्वरित बसेसदेखील लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज होतील. मात्र, बसेस खिळखिळ्या झाल्याने तसेच छत गळके असल्याने नाहकच त्रास सहन करण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. दुरुस्ती कामे प्राधान्याने हाती घेऊन नंतरच बसेस रस्त्यावर उतराव्यात, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.

....

दुरुस्ती कामे सुरु

एका जागेवर उभ्या राहिल्याने काही बसेसची दुरुस्ती कामे आहेत. टायर, बॅटरी, छत दुरुस्तीसह इतर कामे करूनच बसेस प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध करणे सुरू आहे. खराब रस्त्यांमुळे काही बसेसमध्ये ही समस्या असू शकते. तात्काळ दुरुस्ती करण्यात येईल.

- अजयकुमार मोरे, विभागीय नियंत्रक, बीड

...

कामानिमित्त रोज एसटीने प्रवास करावा लागतो. मात्र, काही बसेसचे सीट फाटलेले आहेत तर काही बसेसच्या छतातून पाणी ठिबकते. त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागतो. एसटीचा प्रवास सुखकर म्हणतात, पण खराब बसेसमुळे मनस्ताप सहन करावा लागतो.

- प्रवासी

..

लॉकडाऊन संपल्यानंतर एसटी बसेस सुरू झाल्याने दळणवळण सोपे झाले. मात्र, काही बसेसच्या सीटवर मोठ्या प्रमाणात धूळ साचलेली असते. खिडक्या उघडत नाहीत. याकडेही महामंडळाने लक्ष दिले पाहिजे. सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.

- प्रवासी

...

गाड्यांचे मेंटेनन्स वाढले, पण पैसा नाही!

एका जागेवर बसेस उभ्या असल्याने टायर खराब झाले. काही बसेसमधील बॅटऱ्यांमध्ये अडचणी निर्माण झाल्या. याशिवाय तांत्रिक दुरुस्ती कामेही मोठ्या प्रमाणात करावी लागली. एकीकडे बस उभ्या असल्याने उत्पन्नाचे स्रोत बंद होते. मात्र, दुसऱ्या बाजूला कर्मचाऱ्यांचे वेतन व गाड्यांची दुरुस्ती कामे यावर महामंडळाला मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागला. त्यामुळे एसटी महामंडळाच्या तिजोरीवर भार पडला आहे.

....

कॅप्शन : बीड बसस्थानकात उभी असलेली ही बस. या बसमध्ये गळक्या छतामुळे पावसाचे पाणी सीटवर पडताना दिसत आहे.

....

210821\575821bed_16_21082021_14.jpg

बस

Web Title: Are these buses or a house of leaking leaves?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.