धारूरचा परिसर हिरवाईने नटला, निसर्गप्रेमींची वर्दळ वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:22 AM2021-07-19T04:22:10+5:302021-07-19T04:22:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क धारूर : धारूर शहर व परिसरातील डोंगराळ भागात अलीकडच्या दोन वर्षांत निसर्ग सौंदर्यात प्रचंढ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
धारूर : धारूर शहर व परिसरातील डोंगराळ भागात अलीकडच्या दोन वर्षांत निसर्ग सौंदर्यात प्रचंढ वाढ झाली असून, प्रती महाबळेश्वराचा अनुभव पर्यटकांना येत आहे. डोंगरावर पडणारा पाऊस, वाहणारे झुळझुळ पाणी, दुर्मीळ पक्षी आणि प्राण्यांचा वावर, निसर्गाने ओढलेली हिरवी चादर आकर्षण ठरत आहे.
वाढलेले सिंचन क्षेत्र, मुबलक पाणीसाठ्यामुळे धारूरच्या डोंगर परिसराचा कायापालट झाला आहे. डोंगरावर वाढलेली झाडे या सौंदर्यात भर टाकत आहेत. निसर्गसमृद्धीने नटलेल्या डोंगराने जणून हिरवा शालू परिधान केला, असे चित्र येथे पाहायला मिळत आहे. डोंगर-दऱ्यातून झुळझुळ वाहणारे पाणी, धारूरच्या ऐतिहासिक किल्ल्याची वाहणारी ‘चद्दर’ (चादर), धारूर साठवण तलावाचा वाहणारा सांडवा लक्ष वेधतो. यातच निसर्ग सौंदर्यात भर टाकत पडणाऱ्या पावसाच्या सरी, मोरांसह विविध पक्ष्यांचे मंजुळ आवाज. दुर्मीळ पक्ष्यांचा वावर यामुळे निसर्गप्रेमींची गर्दी डोंगराळ भागात वाढत आहे. या सौंदर्यात भर टाकण्याचे काम राष्ट्रीय महामार्गालगतच झालेल्या आरणवाडी साठवण तलावाने केले असून, हा परिसरत निसर्गप्रेमींसाठी सेल्फी पॉइंट बनत आहे.
180721\img_20210716_190919.jpg~180721\img_20210718_065156.jpg
धारूर येथील ऐतीहासीक खारी दिंडी चद्दर आशी वाहतेय~धारूर शहरा लगतच असणारा धारूरसाठवण तलावाचे सौंदर्य