लिंबोडी येथे सशत्र दरोडा; लाखोंची दागदागिने, रोकड लुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 15:22 IST2019-11-27T15:13:49+5:302019-11-27T15:22:28+5:30

उसतोडणी कामगार देखील गावातून जाऊ लागल्याने गावे ओस पडली आहेत.

Armed robbery at Limbodi; Jewelry, cash robbed | लिंबोडी येथे सशत्र दरोडा; लाखोंची दागदागिने, रोकड लुटली

लिंबोडी येथे सशत्र दरोडा; लाखोंची दागदागिने, रोकड लुटली

कडा : आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथे पहाटे ४ वाजेच्या सुमारास दरोडेखोरांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवत दागिने आणि रोकड लुटल्याची घटना घडली. ८ तोळे सोने, १२ हजार रुपये रोख आणि २  मोबाईल लुटून दरोडेखोरांनी पोबारा केला. 

थंडीचा जोर वाढला असुन उसतोडणी कामगार देखील गावातून जाऊ लागल्याने गावे ओस पडली आहेत. अशा परिस्थितीचा फायदा घेत तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ वाढला आहे. बुधवारी पहाटे लिंबोडी येथील आजिनाथ सुभनराव आंधळे यांच्या कडा-लिंबोडी रस्त्यावरील घरावर सशस्त्र दरोडा पडला. पहाटे ४ वाजेच्या सुमारास घराचे दार तोडून धारदार शस्त्र आणि तोंडाला कपडा बांधलेल्या तिघांनी घरात प्रवेश केला. घरातील सदस्यांना शस्त्राचा धाक दाखवत त्यांनी कपाटातील ८ तोळ्याचे सोन्याचे दागिने, १२ हजार रुपये रोख, २ मोबाईल असा ऐवज लुटला. घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलीसांनी घटनास्थळी भेट दिली.

Web Title: Armed robbery at Limbodi; Jewelry, cash robbed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.