असंघटित, बांधकाम मजूर यांची नोंदणीची व्यवस्था तालुकास्तरावर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:33 AM2021-04-01T04:33:31+5:302021-04-01T04:33:31+5:30

अंबाजोगाई : अंसघटित कामगार, बांधकाम कामगार या वर्गासाठी शासनाने अनेक योजना सुरू केलेल्या आहेत. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी ...

Arrange for registration of unorganized construction workers at taluka level | असंघटित, बांधकाम मजूर यांची नोंदणीची व्यवस्था तालुकास्तरावर करा

असंघटित, बांधकाम मजूर यांची नोंदणीची व्यवस्था तालुकास्तरावर करा

Next

अंबाजोगाई : अंसघटित कामगार, बांधकाम कामगार या वर्गासाठी शासनाने अनेक योजना सुरू केलेल्या आहेत. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी दरवर्षी या कामगारांना नोंदणी करणे आवश्यक असते. अंबाजोगाईत हा कामगार हजारोच्या संख्येने आहे, परंतु, यांची नोंदणी करण्याची सोय फक्त जिल्ह्याची ठिकाणी आहे. कामगारांना पैसे खर्च करून बीड ठिकाणी १०० किमी प्रवास करून जावे लागते.

या त्रासामुळे बीड जिल्ह्यातील असंघटित कामगार, बांधकाम कामगार नोंदणी अत्यंत कमी झाली आहे. याचकारणामुळे शासनाच्या लाभापासून हे कामगार वंचित राहत आहेत.

आज उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांना डी.वाय.एफ.आय. युवक संघटनेतर्फे असंघटित कामगार, बांधकाम मजूर नोंदणीची सोय तालुकास्तरावर अंबाजोगाईत करून द्या, जेणेकरून शासनाच्या योजनाचा लाभापासून वंचित राहणार नाहीत. योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या स्तरावर उपाययोजना कराव्यात. व त्वरित मिळण्याची सोय करावी यासह इतर मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. यावेळी प्रशांत मस्के, जगन्नाथ पाटोळे, देवीदास जाधव, सुहास चंदनशिव, अभिमन्यू माने उपस्थित होते.

योजना भरपूर, पण अंमलबाजावणीच नाही

राज्यात वर्षभरात अनेक बांधकाम कामगारांचा मृत्यू झाला. कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्यास ५ लाख रुपये मदत, नैसर्गिक मृत्यू झाल्यास २ लाख रुपये, अंत्यविधीसाठी १० हजार रुपये, कामगारांच्या विधवा पत्नीस महिन्याला २ हजार रुपये देण्याची तरतूद कामगार कल्याण मंडळाने केलेली आहे. सध्या कामगार कल्याण मंडळाकडे १० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम पडून आहे. तसे असले तरी, १० वर्षात मंडळाने २ हजार कोटीही खर्च केलेले नाहीत. राज्यात सध्या शेकडो बांधकाम कामगारांचा मृत्यू झालेला आहे. त्यांची कुटुंबं हलाखीचं जीवन जगत आहेत.' तसेच राज्यात २३ लाखांहून अधिक बांधकाम कामगारांची नोंद आहे. तसे असले तरी, नूतनीकरण आणि नोंदणीच न झाल्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

Web Title: Arrange for registration of unorganized construction workers at taluka level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.