रामजन्मोत्सव समितीतर्फे गरजूंसाठी मोफत भोजनाची व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:54 AM2021-05-05T04:54:57+5:302021-05-05T04:54:57+5:30

या माध्यमातून रोज ५०० गरीब, गरजू आणि रुग्णांना पौष्टिक जेवण देण्यात येत आहे. आज गावे शांत आहेत, पण ...

Arrangement of free meals for the needy by Ramjanmotsav Samiti | रामजन्मोत्सव समितीतर्फे गरजूंसाठी मोफत भोजनाची व्यवस्था

रामजन्मोत्सव समितीतर्फे गरजूंसाठी मोफत भोजनाची व्यवस्था

Next

या माध्यमातून रोज ५०० गरीब, गरजू आणि रुग्णांना पौष्टिक जेवण देण्यात येत आहे. आज गावे शांत आहेत, पण रुग्णालये भरलेली आहेत. अंबेजोगाईचे ग्रामीण मेडिकल कॉलेज आणि लोखंडी सावरगावचे कोविड रुग्णालयात भरपूर संख्येने तीन तालुक्यांतील लोक येत आहेत. या गरजू लोकांच्या जेवणाची व्यवस्था श्री रामजन्मोत्सव समितीचे कार्यकर्ते स्वतःच्या पैशातून हा उपक्रम राबवित आहेत. मागील १५ दिवसांपासून हा उपक्रम सुरू आहे. आता पुढील १५ दिवस त्यांच्या सोबत ज्ञान प्रबोधिनीनेही जेवण देण्याच्या या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला आहे. दररोज किमान ५०० लोकांना अन्नदान करण्याचा त्यांचा संकल्प आहे. या कामात ज्यांना शक्य असेल, त्यांनी आपला खारीचा सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रसाद चिक्षे यांनी ज्ञान प्रबोधिनी व रामजन्मोत्सव समितीच्या वतीने केले आहे.

Web Title: Arrangement of free meals for the needy by Ramjanmotsav Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.