धारूरमध्ये अडकलेल्या तेलंगणाच्या ऊसतोड मजुरांची प्रशासनाने केली व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 09:01 PM2020-03-28T21:01:19+5:302020-03-28T21:02:03+5:30
तेलंगणा येथील 15 ते 18 ऊसतोड मजूर ऊसतोडणी साठी धारूर तालुक्यातील कोयळ येथे आलेले होते.
धारूर : कोयाळ येथे अडकलेल्या तेलंगणा मधील ऊस तोड कामगाराची अडकले होते तहसील प्रशासनाने तात्काळ दखल घेतली आहे. त्याची जेेेवणाची व्यवस्था करण्यात आली. तसेच त्यांना परत पाठवण्याची व्यवस्था करण्यात येत असून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे
तेलंगणा येथील 15 ते 18 ऊसतोड मजूर ऊसतोडणी साठी धारूर तालुक्यातील कोयळ येथे आलेले होते.परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनामार्फत कलम 144 व संचारबंदी लागू केल्यानंतर ते मागील 5 दिवसापासून कोयाळ येथे अडकून होते. मजुरी बंद पडल्याने दैनंदिन जीवन जगण्याची समस्या समोर होतीच शिवाय जवळ पैसे नसल्याने जेवणाचीही अडचण होत होती.
दरम्यान, त्यांनी गावकर्यांमार्फत तहसीलदार धारूर यांचेशी संपर्क केल्यानंतर तहसीलदार व्हि एस शेडोळकर यांचे सूचनेनुसार नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी यांच्या पथकाने कोयाळ गावास भेट देऊन संबंधित गाडीमालक व मुकादम यांची भेट घेऊन यांचेमार्फत अडकलेल्या व्यक्तींच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. तसेच संबंधितांना लवकरात लवकर त्यांचे मूळ गावी परत जाण्यासाठी पासची व्यवस्था मिळण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनला आवश्यक सूचना केल्या आहेत. पासची व्यवस्था होईपर्यंत अडकलेल्या पैकी कोणीही उपाशी राहणार नाही अशी व्यवस्था करण्यात आली आहे. भेटीचे वेळी पो.कॉ. वडमारे, तलाठी गादेकर व शेलार,शिपाई गिरी,पतंगे व सोनवलकर उपस्थित होते.