महापुरुषांचा अवमान करणाऱ्या भिडेंना अटक करा; कड्यात निघाली प्रतीकात्मक अंत्ययात्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 04:04 PM2023-08-02T16:04:42+5:302023-08-02T16:04:50+5:30
ष्टी तालुक्यातील समाजसेवक, सामाजिक संघटना,शेतकरी संघटना यांनी संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला.
- नितीन कांबळे
कडा: राष्ट्रध्वज व महापुरुषांविषयी बेताल वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ मनोहर कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडे यांची प्रतिकात्मक निषेध अंत्ययात्रा कडा येथे समाजसेवक, सामाजिक संघटना, शेतकरी संघटनेच्या वतीने आज सकाळी काढण्यात आली.
आष्टी तालुक्यातील समाजसेवक, सामाजिक संघटना,शेतकरी संघटना यांनी संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला. राष्ट्रध्वज व महापुरूषांच्या विषयी केलेल्या वक्तव्याबद्दल बुधवारी सकाळी कडा येथे भिडे यांची प्रतीकात्मक निषेध अंत्ययात्रा काढण्यात आली. प्रतिमेला जोडे देखील मारण्यात आले. भिडे यांना त्वरीत अटक करून कडक शासन करावे अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली.
आंदोलनात डाॅ.शिवाजी शेंडगे, परमेश्वर घोडके, राम बोडखे, डाॅ.महेश नाथ, पोपट गरूड, दिपक गरूड, बबलु आखाडे, रहेमान सय्यद, संजय भोजने, सुनिल जाधव आदींचा सहभाग होता. कडा पोलिस चौकीचे पोलिस उपनिरीक्षक अजित चाटे यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवला होता.