पेढ्यातून गुंगीचे औषध देऊन लुटणारा जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:40 AM2021-09-14T04:40:15+5:302021-09-14T04:40:15+5:30
केज तालुक्यातील टाकळी येथील निवृत्त शिक्षक त्रिंबक दादाराव घुले ( वय ६९ ) यांना २० जुलै रोजी केजमध्ये आले ...
केज तालुक्यातील टाकळी येथील निवृत्त शिक्षक त्रिंबक दादाराव घुले ( वय ६९ ) यांना २० जुलै रोजी केजमध्ये आले होते. बंडू उर्फ माणिक सिरसाट ( रा. आरणगाव, ता. केज ) याने ओळख काढून त्यांना चहापाणी करीत खाण्यापिण्यातून गुंगी येईल असे औषध देऊन त्यांना उमरी रस्त्याने नेत ५ ग्रॅमच्या दोन अंगठ्या व खिशातील २ हजार रुपये काढून घेत पोबारा केला. २७ जुलै रोजी त्रिंबक घुले यांच्या फिर्यादीवरून केज पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच पेढ्यात गुंगीचे औषध घालून प्रसाद म्हणून एका महिलेचे दागिने लुटल्याची घटना केजमध्ये घडली होती, तर २४ ऑगस्ट रोजी शहरातील मंगळवार पेठ भागातील छाया मुकुंद वाकळे (वय ४८) नामक महिलेला पेढ्याचा प्रसाद देत गुन्हा घडला होता. लुटीचे विविध गुन्हे दाखल असलेल्या माणिक सिरसाट यास दि. १२ सप्टेंबर रोजी एपीआय संतोष मिसळे व सहकाऱ्यांनी आरणगाव येथे अटक केली.