कलावंतांना नियमित मानधन मिळावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:36 AM2021-03-09T04:36:45+5:302021-03-09T04:36:45+5:30
प्रवाशांची गर्दी कायम अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील बसस्थानकातून लांब पल्ल्याच्या गाड्या मोठ्या प्रमाणात धावतात. तसेच जवळपासच्या ग्रामीण भागातही बसफेऱ्या ...
प्रवाशांची गर्दी कायम
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील बसस्थानकातून लांब पल्ल्याच्या गाड्या मोठ्या प्रमाणात धावतात. तसेच जवळपासच्या ग्रामीण भागातही बसफेऱ्या करणाऱ्या वाहनांची संख्या अंबाजोगाई आगारात मोठ्या प्रमाणात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बसस्थानकात प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. गर्दी वाढत असली तरी बसस्थानकात असणारे प्रवासी कोरोनाबाबतच्या उपाययोजनांबाबत गांभीर्य बाळगत नाहीत. होणाऱ्या गर्दीतून धोका संभवू शकतो. यासाठी बसस्थानक परिसरात दक्षता बाळगावी, अशी मागणी पुढे आली आहे.
फॅन्सी मास्क बाजारात
अंबाजोगाई : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे व नागरिकांनी दक्षता बाळगावी यासाठी आरोग्य प्रशासन व जिल्हा प्रशासन यांच्यावतीने जनजागृती मोहीम सुरू आहे. मास्कचा वापर करण्याबद्दल सक्ती केली जात आहे. शहरवासीयांनी बाजारात मास्क खरेदीसाठी सुरुवात केली आहे. ग्राहकांची मास्क खरेदीसाठी असलेली मोठी पसंती यामुळे बाजारात फॅन्सी मास्क मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आले आहेत.
बँडचालक अडचणीत
अंबाजोगाई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी रोखण्यासाठी शासनाच्या वतीने विविध व्यवसायांवर अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. सार्वजनिक कार्यक्रमांवर मोठ्या प्रमाणावर निर्बंध आणले. त्यामुळे अनेक जणांनी विवाह सोहळ्यासाठी बुक केलेला बँड पथक आता रद्द करीत आहेत. अचानकच तारखा रद्द होत असल्याने बँड व्यावसायिक संकटात सापडले असून, त्यांच्यावर बेरोजगारीची वेळ आली आहे.