आशा सेविकांचे प्रश्न प्राधान्याने विधानभवनात मांडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:35 AM2021-07-30T04:35:27+5:302021-07-30T04:35:27+5:30

अंबाजोगाई : आशा सेविकांची मानधन वाढ, त्यांना सेवेत कायम कसे करता येईल, यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करून त्यांचे ...

Asha Sevikan's questions will be given priority in the Vidhan Bhavan | आशा सेविकांचे प्रश्न प्राधान्याने विधानभवनात मांडणार

आशा सेविकांचे प्रश्न प्राधान्याने विधानभवनात मांडणार

Next

अंबाजोगाई : आशा सेविकांची मानधन वाढ, त्यांना सेवेत कायम कसे करता येईल, यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करून त्यांचे प्रश्न विधानभवनात मांडण्यासाठी मी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही केज विधानसभा मतदारसंघाच्या आ. नमिता अक्षय मुंदडा यांनी दिली.

लोखंडी सावरगाव येथील वृद्धत्व आरोग्य व मानसिक आरोग्य केंद्र येथे अंबाजोगाई तालुक्यातील आशा सेविकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मार्गदर्शन करताना आ. नमिता मुंदडा बोलत होत्या. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी लातूर येथील आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले, वृद्धत्व रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. चंद्रकांत चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बालासाहेब लोमटे यांची उपस्थिती होती.

या वेळी बोलताना आ. नमिता मुंदडा म्हणाल्या, वृद्धत्व आरोग्य व मानसिक आरोग्य केंद्र व स्त्री रुग्णालयाने कोरोनाकाळात खूप कौतुकास्पद काम केले. आता वृद्धत्व आरोग्य केंद्र नॉन कोविड रुग्णांसाठी काम करणार आहे. अशा वेळी रुग्णसेवा देताना निर्माण होणाऱ्या त्रुटींवर मात करता आली पाहिजे. बाहेरगावाहून येणाऱ्या रुग्णांसाठी रुग्णालय परिसरात परिपूर्ण उपाहारगृह, औषधी उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना करावी. आशा सेविकांच्या माध्यमातून या रुग्णालयात होणाऱ्या उपचारांची माहिती रुग्णांपर्यंत पोहोचली पाहिजे. रुग्णसेवेचा लाभ सामान्य रुग्णांना कसा मिळेल, याबाबत सर्वरोग निदान शिबिर व विविध उपक्रम राबविण्यात यावेत, अशा सूचना आ. मुंदडा यांनी केल्या. आशा सेविकांशी मनमोकळी चर्चा करून त्यांचे प्रश्न व समस्या त्यांनी समजून घेतल्या.

या वेळी आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले यांनी आशा सेविकांना ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार रुग्णसेवा कशी उपलब्ध करून देता येईल याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. हे रुग्णालय ग्रामीण भागातील रुग्णांसाठी आधार केंद्र ठरले पाहिजे या दृष्टिकोनातून सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम करून रुग्णसेवेचा अंबाजोगाई पॅटर्न निर्माण करावा, असे आवाहन केले.

या वेळी अधीक्षक डॉ. चंद्रकांत चव्हाण यांनी रुग्णालयात उपलब्ध असणाऱ्या सुविधांची माहिती दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका आरोग्य अधिकारी डॉ बालासाहेब लोमटे यांनी केले.

आशांची झाली आरोग्य तपासणी

या बैठकीला उपस्थित असणाऱ्या सर्व आशा सेविकांची आरोग्य तपासणी या वेळी करण्यात आली. रक्तदाब, रक्तशर्करा, ईसीजी तपासणी करून आशा सेविकांना निरोगी ठेवण्यासाठी दर सहा महिन्याला हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बालासाहेब लोमटे यांनी सांगितले.

290721\img-20210729-wa0040.jpg

आशा सेविकांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना नमिता मुंदडा,आरोग्य उपसंचालक डॉ एकनाथ माले, डॉ.चंद्रकांत चव्हाण,डॉ.बालासाहेब लोमटे

Web Title: Asha Sevikan's questions will be given priority in the Vidhan Bhavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.