शेतकऱ्याच्या स्वप्नांची झाली राख; खरात आडगावात शॉर्टसर्किटमुळे ३० एकरवरील ऊस जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 06:09 PM2020-12-09T18:09:42+5:302020-12-09T18:10:36+5:30
अचानक विद्युतवाहिनी तुटल्याने शॉर्टसर्किट झाले.
माजलगाव : तालुक्यातील खरात आडगाव येथे विज तारेमुळे झालेल्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत ३० एकर ऊस जळाल्याची घटना बुधवारी (दि. 9 ) दुपारी ३.३० वाजेच्या दरम्यान घडली. या आगीत लाखो रूपयाचे नुकसान झाले असून जीवितहानी झाली नाही.
तालुक्यातील खरात आडगाव येथील शेतकरी भारत शेजुळ, चंद्रकला शेजुळ, दत्ता शेजुळ, लहु शेजुळ, बाळासाहेब शेजुळ, बाळासाहेब गोरे, गणेश शेजुळ, हरिभाउ शेजुळ, छत्रभुज शेजुळ, धोंडीराम शेजुळ, वचिष्ठ शेजुळ, नामदेव शेजुळ, तुकाराम शेजुळ या शेतक-यांच्या शेतातुन विद्युतवाहिनी गेलेल्या आहेत. बुधवारी दुपारी अचानक विद्युतवाहिनी तुटल्याने शॉर्टसर्किट झाले. यामुळे शेतातील उसाला आग लागली. क्षणार्धात ही आग सर्वत्र पसरली आणि ३० एकरवरील ऊस भस्मसात झाला. यामुळे शेतकऱ्याचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, माजलगाव नगर परिषदेच्या अग्निशामक दलाचा बंद आल्याने तात्काळ ही आग आटोक्यात आली. या घटनेत कसल्याही प्रकारची जिवीत हानी झाली नाही.