Video: आष्टी तालुक्यास वादळी वाऱ्यासह गारपीठीचा तडाखा; फळबागांचे मोठे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 07:01 PM2023-04-15T19:01:56+5:302023-04-15T19:06:10+5:30
फळबागांसह पिकांचा मोठे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत
- नितीन कांबळे
कडा - आष्टी तालुक्यास आज सायंकाळी अवकाळी पावसासह गारपीठीचा जोरावर तडाखा बसला. मोठ्या प्रमाणावर गारपीट झाल्याने शेतीपिकांसह फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे.
आष्टी तालुक्यात आज अनेक ठिकाणी जोरावर पाऊस झाला. तर काही गावांत वादळी वाऱ्यासह गारपीठ झाली. यामुळे शेतातील कांदा, मका पिकांसह डाळिंब, संत्रा, शेवगा या फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. या परिसरातील पाहणी करून त्वरीत पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी येथील शेतकरी पोपट शिंदे, राजु रामगुडे, भाऊसाहेब आंधळे,राजु शिरसाठ, रामराव जाधव यांनी केली आहे.
बीड: आष्टी तालुका बर्फाळला, वादळी वाऱ्यासह गारपीटीचा तडाखा.
— Lokmat (@lokmat) April 15, 2023
( व्हिडिओ: नितीन कांबळे)https://t.co/CbvSFUBywh#BEED#rainpic.twitter.com/FKpibfpCqC