आष्टी तालुका कडकडीत बंद; ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:31 AM2021-03-28T04:31:35+5:302021-03-28T04:31:35+5:30
प्रशासनाने त्यांना लेखी आश्वासन दिले, २९ मार्चपासून टप्प्याटप्प्याने लाॅकडाऊन शिथिल करु. आष्टी शहरातून पोलिसांनी पथसंचलन करून शहरातील दुकाने ...
प्रशासनाने त्यांना लेखी आश्वासन दिले, २९ मार्चपासून टप्प्याटप्प्याने लाॅकडाऊन शिथिल करु. आष्टी शहरातून पोलिसांनी पथसंचलन करून शहरातील दुकाने बंद ठेवली. दुसऱ्या दिवशी सकाळपासून तालुक्यासह आष्टी शहरातील नागरिकांनी कडकडीत लाॅकडाऊन पाळला. पोलिसांचाही ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला जनतेने मनावर घेतल्याचे दिसून आले.
आष्टी तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पोलीस प्रशासन आरोग्य विभाग कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत असून जिल्ह्यात वाढता आकडा पाहता जिल्हाधिकारी यांनी २६ मार्च मध्यरात्रीपासून ४ एप्रिलपर्यंत लाॅकडाऊनची घोषणा केली पहिल्याच दिवशी शहर, तालुक्यातील खेडे पाड्यातील जनतेने कडकडीत लाॅकडाऊन पाळला. शनिवारी सकाळी आष्टी तालुक्यातील कडा, धानोरा, धामणगाव, दौलावडगाव, अंभोरा या प्रमुख गावासह आष्टी शहरातील प्रमुख बाजारपेठ छत्रपती शिवाजी महाराज चौक,महात्मा फुले चौक,शनी मंदिर,किनारा चौक, मार्केट यार्डसह सर्व व्यावसायिकांचे दुकाने कडकडीत बंद ठेवण्यात आले होते. अत्यावश्यक सेवेसाठी एकच पंप सुरू ठेवण्यात आला होता. पोलीस प्रशासनाचे गस्त व ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेल्या लाॅकडाऊनला आष्टी तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
===Photopath===
270321\img-20210327-wa0214_14.jpg
===Caption===
आष्टी तालुक्यात कडकडीत बंद; ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त, व्यवहार ठप्प झाले आहेत.