बीडचा सुपुत्र अविनाश साबळेने आशियाई क्रीडा स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2023 06:46 PM2023-10-01T18:46:33+5:302023-10-01T18:46:42+5:30

३००० मीटर स्टीपलेसमध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू.

Asian Games2023, Ashti's Avinash Sable won the gold medal in the Asian Games | बीडचा सुपुत्र अविनाश साबळेने आशियाई क्रीडा स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक

बीडचा सुपुत्र अविनाश साबळेने आशियाई क्रीडा स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक

googlenewsNext

नितीन कांबळे

कडा ( बीड) :- आशियाई क्रीडा स्पर्धेत आष्टी तालुक्यातील मांडवा येथील सुपुत्र अविनाश साबळे याने स्टीपलचेस मध्ये सुवर्णपदक पटकावले. भारताचे दिवसभरातील हे दुसरे सुवर्णपदक आहे.

आष्टी तालुक्यातील मांडवा येथील अविनाश साबळे हा प्रतिकुल परिस्थितीतील खेळाडु असुन जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर त्याने अनेक वेळा दमदार कामगिरी केली आहे. त्याने स्पर्धेत जेव्हा अंतिम रेषा ओलांडली तेव्हा त्याचे प्रतिस्पर्धी चित्रातही नव्हते. भारताचे हे दिवसातील दुसरे सुवर्णपदक आहे आणि सध्या चायना  सुरू असलेल्या खेळांमधील साबळेचे पदक हे आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताचे १२ वे सुवर्ण आणि हांगझोऊमधील पहिले ट्रॅक आणि फील्ड सुवर्ण आहे.

अविनाश साबळे याने कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुद्दा दमदार कामगिरी केली होती. बुडापेस्ट वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील त्याच्या ऊर्जा संवर्धन धोरणाच्या विपरीत, साबळेने स्वतःमध्ये आणि उर्वरित क्षेत्रामध्ये अंतर निर्माण करण्यासाठी पुढे धाव घेतली आणि मोठ्या अंतराने शर्यत जिंकली. शेवटच्या ५० मीटरमध्ये, साबळेने त्याच्या जवळ कोणीही नाही हे पाहण्यासाठी मागे वळून पाहिले आणि त्याने शेवटची रेषा ओलांडताना आनंद साजरा केला.

२०१९ मध्ये टोकिओ ऑलम्पिक मध्ये देशाचे प्रतिनिधित्व,  २००६ ते २०१० या दरम्यान तो औरंगाबाद येथील क्रिडा प्रबोधनीत असणाऱ्या अविनाश ने आता पर्यंत ९ वेळेस राष्ट्रीय विक्रम केले. २०१८ मध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवतांना दोहा येथील आशियाई स्पर्धेत रौप्यपदक जिकणारा अविनाश १२ वीस नंतर लष्कर सेवेत दाखल झाला. त्याने गोपाळ सैनी यांचा ३७ वर्षापुर्वीचा स्टेनलेस मध्ये राष्ट्रीय विक्रम मोडीत काढण्याचा भीमपरक्रम केला. ३००० मीटर स्टीपलेस मध्ये पदक जिकणारा पहिला भारतीय खेळाडु आहे.

Web Title: Asian Games2023, Ashti's Avinash Sable won the gold medal in the Asian Games

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.