प्रलंबित नोकरभरतीबाबत ऊर्जा राज्यमंत्र्यांचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:22 AM2021-06-29T04:22:48+5:302021-06-29T04:22:48+5:30
याबद्दल २०१९ मध्ये ‘महावितरण’ने पाच हजार विद्युतसहाय्यक पदांची भरती राबविली होती. त्या भरतीला आज दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. ...
याबद्दल २०१९ मध्ये ‘महावितरण’ने पाच हजार विद्युतसहाय्यक पदांची भरती राबविली होती. त्या भरतीला आज दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. विविध कारणाने ही भरती प्रक्रिया पूर्ण झाली नाही. या भरतीसाठी सर्व उमेदवार हे गरीब, शेतकरी, कष्टकरी मजुरांची मुले प्रतीक्षेत आहेत. दोन वर्षे निकालाची वाट पाहून अनेक विद्युत सहायक उमेदवारांची मानसिक आणि आर्थिक परिस्थिती खालावली आहे. त्यात कोरोनाच्या संकटामुळे परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे याप्रश्नी लक्ष घालून महावितरण प्रशासनाच्या निदर्शनास आणून मार्गदर्शक सूचना कराव्यात व योग्य न्याय द्यावा, अशी मागणी ऊर्जा राज्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी श्रीकिशन सरवदे, श्रीमंत फड, गंगाधर सोनटक्के, रमेश सरवदे, सुभाष खेडकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
===Photopath===
280621\img-20210621-wa0151_14.jpg