गायरान जमिनीतील उभ्या पिकांची नासधूस, २५ जणांविरुद्ध ॲट्रॉसिटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:34 AM2021-09-11T04:34:51+5:302021-09-11T04:34:51+5:30

तालुक्यातील लाडेवडगाव येथे गायरान जमिनीतील उभ्या पिकांची नासधूस केल्याचा प्रकार ९ सप्टेंबर रोजी घडला. यावरुन २५ जणांवर युसूफवडगाव ठाण्यात ...

Atrocities against 25 people, destruction of vertical crops in gyran land | गायरान जमिनीतील उभ्या पिकांची नासधूस, २५ जणांविरुद्ध ॲट्रॉसिटी

गायरान जमिनीतील उभ्या पिकांची नासधूस, २५ जणांविरुद्ध ॲट्रॉसिटी

Next

तालुक्यातील लाडेवडगाव येथे गायरान जमिनीतील उभ्या पिकांची नासधूस केल्याचा प्रकार ९ सप्टेंबर रोजी घडला. यावरुन २५ जणांवर युसूफवडगाव ठाण्यात ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा नोंद झाला.

लाडेगाव येथील २१ जण सर्व्हे क्र. १४३ मधील गायरान जमीन गेल्या ३० वर्षांपासून कसत आहेत; मात्र या जमिनीच्या मालकी हक्कावरुन वाद आहे. जमीन कसणाऱ्यांनी जूनमध्ये सोयाबीन, मूग, उडीद, बाजरी, तूर आदी पिकांची पेरणी केली. पिके जोमात आली; मात्र ९ सप्टेंबर रोजी गावातीलच २५ जणांनी एकत्रित येऊन

उभ्या पिकांत रोटर, जेसीबी फिरवून उभ्या पिकाची नासाडी केली. त्यामुळे अतोनात नुकसान झाले.

रावसाहेब एकनाथ घिरे यांच्या फिर्यादीवरून युसूफवडगाव ठाण्यात २५ जणांविरुद्ध ॲट्राॅसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Atrocities against 25 people, destruction of vertical crops in gyran land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.