भावंडांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 12:24 AM2019-02-10T00:24:43+5:302019-02-10T00:27:01+5:30

शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीला भावंडांनी दुचाकीवरून पळवून नेले. त्यानंतर पुण्यात तिच्यावर अत्याचार केला.

Atrocities against minor girls | भावंडांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

भावंडांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

googlenewsNext
ठळक मुद्देआरोपींना बेड्या : बीड ग्रामीण ठाण्यात पोक्सोसह विविध कलमान्वये गुन्हा

बीड : शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीला भावंडांनी दुचाकीवरून पळवून नेले. त्यानंतर पुण्यात तिच्यावर अत्याचार केला. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात भावंडाविरोधात पोक्सोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गोविंद भारत शिंदे (२२), गोपाळ भारत शिंदे (१९ रा.धानोरा ता.गेवराई) अशी आरोपींची नावे आहेत. १७ जानेवारी रोजी बीड तालुक्यातील एका गावातील पीडित १५ वर्षीय मुलगी शेतात शेळ्या चारण्यासाठी गेली होती. गावात ऊसतोडी आलेल्या गोविंद व गोपाळ या भावंडांनी तिला दुचाकीवर बळजबरीने बसवून पळवून नेले. दुचाकी एका गावात सोडून ते नंतर पुण्याला गेले. रस्त्यात तिला वारंवार जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. त्यानंतर पुण्यात नेऊन एक खोली किरायाने घेतली. पीडिता व गोविंद हे एका खोलीवर तर गोपाळ हा मित्राच्या खोलीवर राहिला. याचदरम्यान गोविंदने पीडितेवर वारंवार अत्याचार केला.
दरम्यान, इकडे मुलगी बेपत्ता झाल्याने नातेवाईकांनी बीड ग्रामीण ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी पीडित मुलीची सुटका करत दोन्ही भावंडांना शुक्रवारी रात्री ताब्यात घेऊन बीडला आणले. मुलीने आपबिती सांगितल्यावर अपहरणाच्या गुन्ह्यात बलात्कार व बाललैंगिक अत्याचाराचे कलम वाढविण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रदीप डोलारे हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. शनिवारी दुपारी त्यांना येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याचे प्रदीप डोलारे यांनी सांगितले.

Web Title: Atrocities against minor girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.