अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस दहा वर्षे सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 11:58 PM2019-02-01T23:58:03+5:302019-02-01T23:58:54+5:30

बीड : अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिला पळवून नेत नंतर विविध शहरात तिच्यावर अत्याचार केला. यातील आरोपीस दहा ...

Atrocities against minor girls; Ten years imprisonment for the accused | अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस दहा वर्षे सक्तमजुरी

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस दहा वर्षे सक्तमजुरी

googlenewsNext
ठळक मुद्देप्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल : सात हजार रुपयांचा दंड

बीड : अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिला पळवून नेत नंतर विविध शहरात तिच्यावर अत्याचार केला. यातील आरोपीस दहा वर्ष सक्तमजूरी व सात हजार रूपयांचा दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. बीड येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्या. प्राची कुलकर्णी यांनी शुक्रवारी हा निकाल दिला.
पप्पू दिलीप चव्हाण (रा.राणेगाव ता.शेवगाव जि.नगर) असे आरोपीचे नाव आहे. तो पत्नी,मुले व इतर कुटूंबासह वांगी (ता.बीड) येथे पाल ठोकून राहत होता. १३ फेबु्रवारी २०१८ रोजी पप्पूने अल्पवयीन मुलीस ‘मला माझी बायको आवडत नाही, मी तिला सोडून देवून तुझ्याशी लग्न करतो’ असे आमिष दाखवत शेतामध्ये तिच्यावर अत्याचार केला होता. दरम्यान पीडितेने लग्नाचा हट्ट धरल्यानंतर पप्पू चव्हाण याने तिस पळवून नेत परळी, कुर्डूवाडी, पंढरपूर, कडेठाण या ठिकाणी अत्याचार केला. दरम्यान मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या वडिलांनी बीड ग्रामीण ठाण्यात नोंदवली होती. त्यावरुन आरोपीविरुध्द सुरुवातीला अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. ग्रामीण ठाण्याचे उपनिरीक्षक प्रदीप डोलारे यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला होता. नंतर पीडितेसह आरोपीस पाटस या गावातून ताब्यात घेतले. पीडितेचा जवाब नोंदवून घेत यात अत्याचार व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाद्वारे कलम वाढवले.
उपनिरीक्षक डोलारे यांनी सर्व तपास करुन आरोपीविरुध्द बीड न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यानंतर हे प्रकरण प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्याकडे वर्ग करण्यात आले. या प्रकरणाची सुनावणी झाली. सहाय्यक सरकारी वकील सुहास सुलाखे यांचा युक्तीवाद ग्राह्य धरत प्रमुख जिल्हा व सत्र न्या.प्राची कुलकर्णी यांनी आरोपी पप्पू दिलीप चव्हाण यास दोषी धरत दहा वर्ष सक्तमजूरी व सात हजार रूपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहा.सरकारी वकील सुहास सुलाखे यांनी काम पाहिले. त्यांना जिल्हा सरकारी वकील अजय राख व इतरांनी सहकार्य केले.

Web Title: Atrocities against minor girls; Ten years imprisonment for the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.