दुपटीने व्याज मागून मारहाण करणाऱ्या सावकारासह तिघांवर अ‍ॅट्रॉसिटी गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 11:44 PM2019-06-01T23:44:05+5:302019-06-01T23:44:27+5:30

ठरलेल्या व्याजदरापेक्षा ऐनवेळी दुपटीने व्याज मागत सावकारासह तिघांनी एका तरुणास बेदम मारहाण केली आणि कुठेही वाच्यता न करण्यासाठी धमक्या दिल्या.

An Atrocity Offense on Three People With Double Money | दुपटीने व्याज मागून मारहाण करणाऱ्या सावकारासह तिघांवर अ‍ॅट्रॉसिटी गुन्हा

दुपटीने व्याज मागून मारहाण करणाऱ्या सावकारासह तिघांवर अ‍ॅट्रॉसिटी गुन्हा

Next
ठळक मुद्देमारहाण करीत जिवे मारण्याच्या धमक्या। शुक्रवारी पिंपळनेर ठाण्यात तक्रारीवरून गुन्हा नोंद

बीड : ठरलेल्या व्याजदरापेक्षा ऐनवेळी दुपटीने व्याज मागत सावकारासह तिघांनी एका तरुणास बेदम मारहाण केली आणि कुठेही वाच्यता न करण्यासाठी धमक्या दिल्या. ही घटना बीड तालुक्यातील आंबेसावळीत सोमवारी दुपारी घडली. याप्रकरणी तिघांवर सावकारकीसह अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा नोंद झाला आहे.
आंबेसावळी येथील प्रशांत ऊर्फ सिद्धार्थ तात्याराम निसर्गंध (वय २७) या तरुणाने सात महिन्यापूर्वी काळेगाव येथील सावकार भारत रघुनाथ डोके याच्याकडून शेकडा ५ टक्के व्याजदराने ५ हजार रुपये घेतले होते. पंधरा दिवसापूर्वी प्रशांतने भारतला व्याजासह साडेसात हजार रुपये परत केले आणि हिशोबात काही रक्कम शिल्लक राहत असेल तर नंतर देतो, असे सांगितले. सोमवारी दुपारी ३.३० वाजता प्रशांत शेळ्या चारण्यासाठी स्वत:च्या शेतात घेऊन गेले असता सावकार भारत डोके आणि अर्जुन अंजाभाऊ बांडे हे दोघे दुचाकीवरून तिथे आले. प्रशांतचे चुलते देविदास निसर्गंध यांच्याजवळ जातीवाचक शिवीगाळ करत त्यांनी प्रशांतबद्दल विचारपूस केली आणि नंतर आंबेसावळीला निघून गेले. दुपारी ४ वाजता ते दोघे शेषेराव रुस्तम गुंदेकर (रा. आंबेसावळी) याला सोबत घेऊन पुन्हा प्रशांतच्या शेताकडे आले आणि तुला कर्जाने दिलेले पैसे मला १० टक्के व्याजाने आत्ताच पाहिजेत, असा तगादा त्यांनी प्रशांतकडे लावला. परंतु हिशोबाने पैसे दिले असून सध्या जवळ काहीच नसल्याचे सांगत प्रशांतने पैसे देण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे चिडलेल्या त्या तिघांनी प्रशांतला कुºहाडीचा दांडा आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी भांडण सोडविण्यासाठी आलेल्या देविदास निसर्गंध यांनाही त्या तिघांनी शिवीगाळ करून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. मारहाणीत जखमी झालेल्या प्रशांतने जिल्हा रुग्णालयात उपचार घेतले आणि त्यानंतर शुक्रवारी पिंपळनेर पोलिसांत तक्रार दिली. त्याच्या तक्रारीवरून तिन्ही आरोपींवर सावकारकीसह अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी भास्कर सावंत करत आहेत.
कुºहाडीचा दांडा, लाथाबुक्क्यांनी मारहाण
सोमवारी दुपारी प्रशांत शेळ्या चारण्यासाठी स्वत:च्या शेतात घेऊन गेले असता सावकार भारत डोके आणि अर्जुन बांडे हे दोघे दुचाकीवरुन तेथे आले आणि प्रशांतचे चुलतभाऊ देविदास यास जातीवाचक शिवीगाळ करीत प्रशांतची विचारपूस केली. दुपारी ४ वा. ते दोघे शेषेराव गुंदेकर याला सोबत घेऊन प्रशांतच्या शेताकडे आले आणि दिलेले पैसे १० टक्के व्याजाने आत्ताच पाहिजेत, असा तगादा लावला, यावर प्रशांतने असमर्थता दर्शविताच मारहाण सुरू केली.

Web Title: An Atrocity Offense on Three People With Double Money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.