कोरेगाव भीमा येथील हल्ला पूर्वनियोजित कट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 12:38 AM2018-01-05T00:38:22+5:302018-01-05T00:39:09+5:30

कोरेगाव भीमा येथील हल्ला पूर्वनियोजित कट होता. ही घटना सरकार प्रायोजित होती. सरकारच्या ताकदीमुळे एकबोटे, भिडेंनी ही घटना घडवून आणली, आरएसएस ही सर्वात मोठी आतंकवादी संघटना असून त्यावर बंदी घालावी, अशी मागणी बहुजन विकास मोर्चाचे बाबूराव पोटभरे यांनी केली.

The attack on Koregaon Bhima was premeditated | कोरेगाव भीमा येथील हल्ला पूर्वनियोजित कट

कोरेगाव भीमा येथील हल्ला पूर्वनियोजित कट

Next
ठळक मुद्देबाबूराव पोटभरेंचा डीपीडीसीचा राजीनामा

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : कोरेगाव भीमा येथील हल्ला पूर्वनियोजित कट होता. ही घटना सरकार प्रायोजित होती. सरकारच्या ताकदीमुळे एकबोटे, भिडेंनी ही घटना घडवून आणली, आरएसएस ही सर्वात मोठी आतंकवादी संघटना असून त्यावर बंदी घालावी, अशी मागणी बहुजन विकास मोर्चाचे बाबूराव पोटभरे यांनी केली.

गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कोरगाव भीमा प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का बसले आहेत? असा सवाल करुन पोटभरे म्हणाले, ते आरएसएसचे बाहुले आहेत. मुख्यमंत्री म्हणतात, न्यायालयीन चौकशी करु, कसली चौकशी करताय ही तर पळवाट असल्याचा आरोप पोटभरेंनी केला. कोरेगाव भीमा येथील घटनेचे मूळ शोधून कारवाई करण्याऐवजी निषेध, आंदोलन करणाºयांवर कारवाई केली जात आहे. एकबोटे, भिडे यांच्यविरुद्ध देशद्रोहाचा तसेच राहुलच्या मृत्युमुळे खुनाचा गुन्हा दाखल करुन मकोकाअंतर्गत कारवाई करावी अशी मागणी त्यांनी या वेळी केली.
या वेळी भीम स्वराज्य सेनेचे विकास जोगदंड, दयानंद स्वामी, विजय साळवे, प्रशांत वासनिक, राजेश साळवेसह कार्यकर्ते उपस्थित होते.

सरकार जातीयवादी असल्याचा पोटभरेंचा आरोप
कोरेगाव भीमा येथील घटनेचा धागा पकडत बहुजन विकास मोर्चाचे बाबूराव पोटभरे यांनी गुरुवारी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला. त्यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. आपले सरकार आंबेडकरद्रोही, जातीयवादी आणि मराठा, दलित, आदिवासी, ओबीसी, मुस्लिमविरोधी असल्यामुळे हा राजीनामा देत असल्याचे पालकमंत्र्यांना दिलेल्या राजीनामापत्रात पोटभरे यांनी स्पष्ट केले.
राष्टÑीय स्वयंसेवक संघप्रणीत सत्तारुढ भाजपच्या सरकारने दिलेले कुठलेही पद स्विकारणे म्हणजे आरएसएसच्या संविधान बदलण्याच्या भूमिकेला साथ देण्यासारखे आहे. भाजपा, आरएसएसच्या जातीयवादी मानसिकतेच्या निषेधार्थ राजीनामा देत आहे. याप्रकरणी कुठलीही तडजोड करणार नाही.

पालकमंत्री सामाजिक समतेसाठी काम करत नाहीत, आजपासून नाते तुटल. मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांच्या निषेधार्थ हा राजीनामा आहे, मंत्रीपदी असतोतरी राजीनामा दिला असता. यापुढे सच्चे आंबेडकरी, शिवरायांचे अनुयायी अशा पदांना लाथ मारतील. भाजप, संघाला मदत करणाºयांना पुढची पिढी माफ करणार नाही. यापुढे भाजपविरोधात आपली राजकीय भूमिका राहील असेही त्यांनी स्पष्ट केले.

राजू जोगदंड यांचाही राजीनामा
रिपाइंचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या आदेशानुसार रिपाइंचे जिल्हा सरचिटणीस राजू जोगदंड यांनीही जिल्हा नियोजन समिती सदस्यपदाचा राजीनामा पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे दिला आहे. भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून कडक शासन करावे, अशी मागणी यावेळी जोगदंड यांनी केली आहे. यावेळी बापू पवार, किशन तांगडे, गोवर्धन वाघमारे, ज्ञानोबा माने, नुरुल खान, सिद्दीक फारोकी, संगिताताई वाघमारे, अविनाश जोगदंड, अमर विद्यागर, गोट्या वीर, प्रा.बाळासाहेब गव्हाणे, अ‍ॅड.श्रीकांत साबळे, भैय्यासाहेब मस्के, गौतम कांबळे, प्रभाकर चांदणे, दिलीप खंदारे, विलास जोगदंड, भाऊसाहेब कांबळे, सतीश शिनगारे, अंकुश गंगावणे, आनंद सरपते यासह जिल्हाभरातील रिपाइंचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: The attack on Koregaon Bhima was premeditated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.