रस्त्याच्या वादातून तिघांवर हल्ला; एक गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:23 AM2021-06-10T04:23:17+5:302021-06-10T04:23:17+5:30
गेवराई : शेतरस्त्याच्या वादातून सातजणांनी संगनमत करून तिघांवर प्राणघातक हल्ला केला. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला असून, ...
गेवराई : शेतरस्त्याच्या वादातून सातजणांनी संगनमत करून तिघांवर प्राणघातक हल्ला केला. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला असून, या जखमींनी तत्काळ गुन्हा दाखल करा, त्याशिवाय आम्ही येथून उठणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेत पोलीस ठाण्यात ठिय्या मारला. दरम्यान, वरिष्ठ पोलिसांच्या आश्वासनानंतर जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.
गेवराई तालुक्यातील लुखामसला शिवारात गट नं. १६ मध्ये सविताबाई थोरात यांची जमीन असून बुधवारी या रस्त्यावरून सविताबाई थोरात व त्यांची दोन मुले अनुराज थोरात, केशव थोरात यांनी शेतात ऊस लागवडीसाठी ट्रॅक्टरमधून बेणे नेले. दरम्यान, तुम्ही रस्त्यावरून ट्रॅक्टर का नेला या कारणावरून शुभम वसंत व्हरकटे, वसंत व्हरकटे, नंदकुमार अंकुश सरगर, रावसाहेब दगडूबा व्हरकटे, करण वसंत व्हरकटे, रेखा वसंत व्हरकटे, दिव्या वसंत व्हरकटे यांनी वाद घातला. यानंतर संगनमत करून काठी-कुऱ्हाडीने थोरात बंधूंसह त्यांच्या आईला मारहाण केली. यामध्ये अनुराज याला डोक्यात कुऱ्हाडीचा गंभीर घाव लागल्याने तो रक्तबंबाळ झाला. आई सविताबाई व केशव यांनादेखील काठीने जबर मारहाण झाल्याने तेदेखील जखमी झाले. जखमी तिघांनाही गेवराई उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार करून अनुराजला गंभीर मार लागल्याने रेफर करण्यात आले. मात्र या जखमींनी पोलीस ठाणे गाठून वरील आरोपींवर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. ठाणे अंमलदार व बीट अंमलदार देशमुख यांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याने जखमींनी ठाण्यात ठिय्या मांडला. यावेळी पोलीस निरीक्षक रवींद्र पेलगुरवार व साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांनी तुमच्यावर अन्याय होणार नाही, आरोपींवर योग्य कारवाई करण्यात येईल. तुम्ही अगोदर उपचार घ्या, जिल्हा रुग्णालयात जबाब घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना तत्काळ पाठविण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. दरम्यान, यापूर्वीही आरोपींनी आम्हाला मारहाण केली होती, तशा तक्रारीही पोलीस ठाण्यात करण्यात आल्या. मात्र कुठलीही कारवाई न झाल्यानेच आमच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याचे अनुराज थोरात यांनी सांगितले.
गेवराई येथे जखमींनी गुन्हा दाखल करा म्हणून पोलीस ठाण्यात ठिय्या मारला होता.
===Photopath===
090621\img-20210609-wa0281_14.jpg