परळीत एटीएम फोडून रोकड चोरीचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:28 AM2021-05-03T04:28:18+5:302021-05-03T04:28:18+5:30
परळी: येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ असलेल्या जलालपूर रोडवर शनिवारी मध्यरात्री दोन वाजता एचडीएफसी बँकेचे एटीएम चोरून नेण्याचा प्रयत्न ...
परळी: येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ असलेल्या जलालपूर रोडवर शनिवारी मध्यरात्री दोन वाजता एचडीएफसी बँकेचे एटीएम चोरून नेण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली. दरम्यान या ठिकाणी परळी शहर व संभाजीनगर पोलिसांची गस्त चालू असल्याने पोलीस तातडीने पोहचले. पोलिसांचे वाहन पाहताच चोरटे एटीएम रस्त्यावरच टाकून फरार झाले . या प्रकरणी लोहा येथे जाऊन गुन्ह्यात वापरलेली कार पोलिसांनी रविवारी जप्त केली तर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील जलालपूर रोडवर एचडीएफसी बँकेचे एटीएम आहे. येथे शनिवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी पैसे असलेली मशीन बाहेर काढली आणि ती वाहनात टाकण्याच्या तयारीत असतानाच गस्त घालणाऱ्या पोलिसांचे वाहन दिसताच चोरट्यांनी एटीएम रस्त्यावर ठेवून वाहनामध्ये बसून चोरटे पळून गेले. पोलिसांनी त्यांच्या वाहनाचा पाठलागही केला पण ते सापडले नाहीत.
या घटनेची माहिती शहर पोलिसांनी सर्व पोलीस ठाण्यांना कळविली. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील पोलिसही सतर्क झाले. नाकाबंदी चालू असल्याचे चोरट्यांच्या लक्षात आल्यांनी त्यांनी लोहा येथे त्यांच्याकडील कार बेवारस अवस्थेत सोडून फरार झाले. परळी शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक खरात, डी बी पथकाचे जमादार भास्कर केंद्रे ,शंकर बुद्दे यांनी माहितीवरून लोहा येथे जाऊनन संबंधित गुन्ह्यातील कार परळी पोलीस ठाण्यात आणली आहे. एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे . बँकेच्या एटीएममध्ये ८ लाख ३८ हजार रुपये होते. पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा डाव उधळला असलातरी हे चोरटे कोणत्या गावचे आहेत. यापूर्वी त्यांनी कुठे कुठे एटीएम फोडले. कार चोरीची आहे का? याचा शोध परळी शहर पोलीस करीत असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक खरात यांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक मोहन जाधव हे घटनेचा तपास करत आहेत.
===Photopath===
020521\sanjay khakare_img-20210502-wa0044_14.jpg~020521\sanjay khakare_img-20210502-wa0045_14.jpg