...अन् थोडक्यात अनर्थ टळला; बीडमध्ये पालकमंत्री धनंजय मुंडेंसमोरच आत्मदहनाचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 11:41 AM2022-01-26T11:41:54+5:302022-01-26T11:45:29+5:30

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न झाल्याने एकच गोंधळ उडाला होता. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी या आंदोलकाची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.

Attempt of suicide in front of Guardian Minister Dhananjay Munde in Beed | ...अन् थोडक्यात अनर्थ टळला; बीडमध्ये पालकमंत्री धनंजय मुंडेंसमोरच आत्मदहनाचा प्रयत्न

...अन् थोडक्यात अनर्थ टळला; बीडमध्ये पालकमंत्री धनंजय मुंडेंसमोरच आत्मदहनाचा प्रयत्न

Next

बीड- रस्त्याविषयी तक्रार देऊनही कारवाई होत नसल्याचा आरोप करत एकाने पोलीस मुख्यालयावर झेंडावंदनस्थळी पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यामोरच आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यास रोखल्याने अनर्थ टळला.

विनोद शेळके असे आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. बीडमधील पंचशीलनगरच्या अलीकडे झालेले रस्त्याचे काम दर्जाहीन असल्याचा आरोप शेळके यांनी केलेला आहे. तक्रार करूनही कारवाई झाली नाही. यामुळे त्यांनी प्रजासत्ताक दिनी पोलीस मुख्यालयी ध्वजारोहण समारंभ प्रसंगी अंगावर डिझेल ओतून घेतले. यानंतर पोलीस तत्काळ त्यांच्या दिशेने धावले आणि त्यांनी त्याला रोखले यामुळे पुढील  अनर्थ टळला. 

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न झाल्याने एकच गोंधळ उडाला होता. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी या आंदोलकाची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. कोणताही रस्ता  एका व्यक्तीसाठी नसतो, त्या रस्त्याची आम्ही चौकशी करू,अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.

दरम्यान, विनोद शेळके यांना ताब्यात घेऊन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणले असून कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Web Title: Attempt of suicide in front of Guardian Minister Dhananjay Munde in Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.