वडिलांना विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:35 AM2021-05-09T04:35:17+5:302021-05-09T04:35:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : वडिलांनी ५० हजार रुपये न दिल्यामुळे मुलगा, सून, नातवानेच वडिलांना बळजबरीने विषारी औषध पाजले. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : वडिलांनी ५० हजार रुपये न दिल्यामुळे मुलगा, सून, नातवानेच वडिलांना बळजबरीने विषारी औषध पाजले. त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना आष्टी तालुक्यातील पेठपांगरा येथे घडली. दरम्यान, वडिलांनी ७ मे रोजी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
आष्टी तालुक्यातील पेठपांगरा येथील काशिनाथ लव्हू मिसाळ (वय ८५, रा.पेठपांगरा, ता. आष्टी) यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मुलगा भीमसेन काशिनाथ मिसाळ, सून कांताबाई भीमसेन मिसाळ व नातू सोमिनाथ भीमसेन मिसाळ यांनी मला ५० हजार रुपये मागितले होते. ते पैसे देण्यास मी नकार दिला. याचा राग मनात धरून २० एप्रिल रोजी मला दाव्याने बांधून घरात कोंडले. तसेच गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, बंद घरात प्लास्टिकच्या पिशव्या जाळल्या. त्याच्या धुरामुळे माझा जीव गुदमरला होता. या दरम्यान, मला विषारी द्रव पाजून मारण्याचा प्रयत्नदेखील केला.
याप्रकरणी पोलिसांनी मुलगा भीमसेन मिसाळ, कांताबाई मिसाळ, सोमिनाथ मिसाळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक डोंगरे हे करीत आहेत.