कारागृहातच आरोपीचा गळफास घेण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 12:04 AM2019-01-02T00:04:24+5:302019-01-02T00:05:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : खुनाच्या गुन्ह्यात बीड जिल्हा कारागृहात बंदी असलेल्या एका आरोपीने खिडकीच्या गजाला लुंगीच्या कपड्याने गळफास ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : खुनाच्या गुन्ह्यात बीड जिल्हा कारागृहात बंदी असलेल्या एका आरोपीने खिडकीच्या गजाला लुंगीच्या कपड्याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी मध्यरात्री १ वाजता घडली. इतर कैदी ओरडल्याने पहारेकºयांनी तात्काळ धाव घेत त्याला वाचविले. सध्या या आरोपीवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती ठणठणीत आहे.
कालु उर्फ अरबाज खान फिरोज खान (३० रा.बुंदेलपुरा, बीड) असे आरोपीचे नाव आहे. १७ मे २०१७ रोजी रात्री सात वाजेच्या सुमारास कारंजा परिसरात कालुसह त्याच्या इतर सात साथीदारांनी शहाबाज खान यांचा धारदार शस्त्राने वार करून खून केला होता. याचा तपास करून दोषारोपपत्रही न्यायालयात दाखल करण्यात आले. त्यानुसार या आरोपींना बीडच्या कारागृहात ठेवण्यात आलेले आहे. कालु हा बराक क्रमांक ७ मध्ये बंदी होता. रात्री १ वाजता त्याने आपल्या अंगावरील लुंगीच्या कपड्याच्या सहाय्याने खिडकीला गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र इतर कैदी ओरडले. त्यामुळे पहाºयावर असलेले संजिव चांदणे व वाल्मिक चिकणे यांनी तात्काळ बराक उघडून त्याला थांबविले. त्यानंतर तात्काळ त्याला जिल्हा रूग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर वॉर्ड क्रमांक ५ मध्ये उपचार सुरू असून प्रकृती ठणठणीत असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात येते. दरम्यान, पहाटे ५.३० वाजता चांदणे यांच्या फिर्यादीवरून कालुविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून कलम ३०९ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहायक फौजदार हरीश्चंद्र गिरी हे करीत आहेत.
तर तो बचावला नसता?
कालुला आपल्या बराकमधील सर्व कैदी झोपले असावेत, असा समज होता. त्यामुळे त्याने अंगावरील लुंगी काढली आणि खिडकीच्या गजाला बांधली. गळफास लावून लटकताच इतर कैद्यांनी आरडाओरडा केला.
तात्काळ पहारेकºयांनी त्याला कैद्यांच्या मदतीने खाली उतरविले आणि जिल्हा रूग्णालयात दाखल केले. सुदैवाने काही कैदी जागे होते, त्यामुळे दुर्घटना मोठी टळली.
अधीक्षक पवार ‘नॉट रिचेबल’
यापूर्वीही कारागृहात अनेकांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे. सोमवारी रात्री घडलेल्या घटनेला अनुसरून बाजू समजून घेण्यासाठी कारागृह अधीक्षक एम.एस.पवार यांना वारंवार भ्रमणध्वणीवरून संपर्क केला. मात्र त्यांचा भ्रमणध्वणी नॉटरिचेबल होता. त्यामुळे बाजू समजली नाही.