परळी कोविड केअर सेंटरमधील रुग्णांच्या तक्रारींची दखल; समस्या दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:19 AM2021-03-29T04:19:25+5:302021-03-29T04:19:25+5:30

पालकमंत्री धनंजय मुंडे हे कोविड -१९ उपचारार्थ रुग्णालयात दाखल असले तरी बीड जिल्हा व परळी या त्यांच्या मतदारसंघावर त्यांचे ...

Attention to patient complaints at Parli Covid Care Center; Problem solved | परळी कोविड केअर सेंटरमधील रुग्णांच्या तक्रारींची दखल; समस्या दूर

परळी कोविड केअर सेंटरमधील रुग्णांच्या तक्रारींची दखल; समस्या दूर

Next

पालकमंत्री धनंजय मुंडे हे कोविड -१९ उपचारार्थ रुग्णालयात दाखल असले तरी बीड जिल्हा व परळी या त्यांच्या मतदारसंघावर त्यांचे बारकाईने लक्ष असते. धनंजय मुंडे यांच्या कार्यालयातून परळीतील कोविड पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची विचारपूस करत असताना, अंघोळीसाठी गरम पाणी नाही, सोलार नादुरुस्त आहे, जनरेटर नाही आदी समस्या समोर आल्या होत्या. याबाबत माहिती कळविली असता नगर परिषद गटनेते वाल्मिक कराड यांनी तातडीने आयटीआय येथील कोविड केअर सेंटरला भेट दिली. आरोग्य अधिकारी, तहसीलदार यांना तेथे बोलावून तेथील अपुरी व्यवस्था व अन्य समस्यांची माहिती घेतली व तत्काळ जिल्हाधिकारी तसेच जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे याबाबत विनंती केली. जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी या कोविड केअर सेंटरला नवीन जनरेटर उपलब्ध करून देणे, तसेच येथील सोलार यंत्रणा दुरुस्त करून कार्यान्वित करणेबाबत संबंधितांना निर्देशित केले असून रुग्णांच्या तक्रारीची दखल घेत २४ तासांच्या आत समस्या सोडविल्या आहेत.

वाल्मिक कराड यांच्यासह, परळीचे तहसीलदार सुरेश शेजुळ, नायब तहसीलदार बाबूराव रुपनर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अर्षद शेख , शंकर आडेपवार ,नगरसेवक विजय भोयटे यावेळी उपस्थित होते. धनंजय मुंडे यांच्या कार्यालयामार्फत कोरोना संसर्गाच्या सुरुवातीच्या काळापासून ‘कोरोना हेल्प सेंटर’ हे डिजिटल कॉल सेंटर स्वतः धनंजय मुंडे यांच्या देखरेखीत चालवले जात असून, याद्वारे कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची विचारपूस करून त्यांना आवश्यक मदत केली जाते. याद्वारे रुग्णांना बेड उपलब्ध करणे, डॉक्टरांशी बोलून अडचणी सोडवणे, ते अगदी खाजगी रुग्णालयात बिलात सवलत मिळवून देण्यापर्यंत मदत केली जाते. या कॉल सेंटरद्वारे परळी मतदारसंघातच नव्हे तर बीड जिल्हा व जिल्ह्याबाहेरील रुग्णांना देखील मदत करण्यात येते.

===Photopath===

280321\28bed_2_28032021_14.jpg

===Caption===

न.प. गटनेते वाल्मिक कराड यांनी या कोविड सेंटरला भेट देऊन रुग्णांच्या अडचणींचे निवारण केले .

Web Title: Attention to patient complaints at Parli Covid Care Center; Problem solved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.