गांजासाठी पैसे न दिल्याने आत्याचा खून; मृतदेह दोरीस बांधून फरफटत नेणारा भाचा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2022 03:57 PM2022-01-24T15:57:41+5:302022-01-24T15:58:11+5:30

तल्लफ भागविण्यासाठी पैसे मागितले. ते न दिल्याने दोरीने आत्याचा गळा आवळून खून केला.

Aunty's murder for not paying for marijuana and alcohol; Nephew arrested who pulled death body | गांजासाठी पैसे न दिल्याने आत्याचा खून; मृतदेह दोरीस बांधून फरफटत नेणारा भाचा अटकेत

गांजासाठी पैसे न दिल्याने आत्याचा खून; मृतदेह दोरीस बांधून फरफटत नेणारा भाचा अटकेत

googlenewsNext

केज : तालुक्यातील नांदूरघाटजवळील हंगेवडी येथे एका वृद्धेचा खून करुन गळ्यात दोरी बांधून मृतदेह शंभर फुटांपर्यंत फरपटत नेल्याची धक्कादायक घटना २२ जानेवारी रोजी उघडकीस आली होती. दरम्यान, २४ तासांच्या आत या प्रकरणाचा उलगडा करुन पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. गांजा व दारूच्या व्यसनासाठी पैसे न दिल्याने भाच्याने आत्याचा बळी घेतल्याचे समोर आले आहे.

हंगेवाडी येथील सखूबाई बन्सी शिंदे (६०) या वृद्ध महिलेचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना २१ जानेवारी रोजी रात्री घडली होती. त्यांचा मृतदेह २२ रोजी सकाळी गायरानात आढळून आल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, मृत सखूबाई यांच्या गळ्यात दोरी आढळली होती, शिवाय शंभर फुटांपर्यंत त्यांना फरपटत ओढल्याच्या खुणा घटनास्थळी निदर्शनास आल्याने खळबळ उडाली होती. गोवर्धन सरदार काळे यांच्या तक्रारीवरुन केज ठाण्यात भाचा राजू ऊर्फ टुल्या बन्सी शिंदे (रा.हंगेवाडी, ता.केज) याच्यावर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. त्याला दारु, गांजाचे व्यसन जडले होते. २१ रोजी त्याने तल्लफ भागविण्यासाठी सखूबाई शिंदे यांच्याकडे पैसे मागितले. ते न दिल्याने त्याने दोरीने आत्याचा गळा आवळून खून करत तिला फरफटत ओढून नेत तिचे डोके दगडाने ठेचले. त्यानंतर तो पसार झाला होता.

खर्डा येथून घेतले ताब्यात
केज ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांनी तपासाची चक्र वेगाने फिरवत अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा येथून २३ जानेवारी रोजी राजू ऊर्फ टुल्या शिंदे याच्या मुसक्या आवळल्या. त्यास २४ रोजी न्यायालयापुढे हजर केले जाणार असल्याचे संतोष मिसळे यांनी सांगितले. 

Web Title: Aunty's murder for not paying for marijuana and alcohol; Nephew arrested who pulled death body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.