फळांचे नमुने तपासणीसाठी औरंगाबादला
By admin | Published: May 5, 2017 03:51 AM2017-05-05T03:51:48+5:302017-05-05T03:51:48+5:30
गोलंग्री येथे उलट्या-मळमळ होऊन दोन भावंडांचा मृत्यू झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने येथील फळांचे नमुने तपासणीसाठी
बीड : गोलंग्री येथे उलट्या-मळमळ होऊन दोन भावंडांचा मृत्यू झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने येथील फळांचे नमुने तपासणीसाठी औरंगाबादला पाठविले आहेत.
भारत शिंदे यांची साई (२) व ओम (५) ही दोन मुले बुधवारी पहाटे झोपेत अत्यवस्थ झाली. दवाखान्यात नेताना ओमचा मृत्यू झाला, तर सात तासांनंतर साईनेही प्राण सोडले. भारत यांच्या पत्नी प्राजक्तावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. ओम व साई यांचा मृत्यू विषबाधेने झाला की सर्पदंशाने हे स्पष्ट झालेले नाही. दोघांचाही व्हिसेरा राखून ठेवला आहे. शवविच्छेदन अहवाल येण्यास १५ दिवस लागतील. त्यानंतर मृत्यूचे कारण कळेल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश चव्हाण म्हणाले. (प्रतिनिधी)