अंबाजोगाईत अॅटोमोबाईल्स दुकान आगीत भस्मसात; लाखोंचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 04:26 PM2020-10-12T16:26:10+5:302020-10-12T16:28:02+5:30
Automobiles shop on fire in Ambajogai आग वेगाने पसरत गेल्यास आजूबाजूसह वरच्या मजल्यावरील दुकानानाही झळ बसली असती
अंबाजोगाई : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एका अॅटोमोबाईल्स दुकानाला रविवारी रात्री अकरा वाजता आग लागली. यात दुकानातील किंमती साहित्य जळाल्याने तेरा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी नगर पालिकेच्या अग्निशमन दलासह नागरिकांनी तातडीने धाव घेत आग आटोक्यात आणली.
अंबाजोगाई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील नगर पालिकेच्या व्यापारी संकुलात किशोर रांदड यांचे अॅटोमोबाईल्सचे दुकान आहे. रविवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास या दुकानाला अचानक आग लागली. आग कशामुळे लागले हे स्पष्ट होवू शकले नाही, मात्र दुकानातून धूर येवू लागल्याने शेजारच्या नागरिकांना हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर तातडीने अंबाजोगाई पालिकेच्या अग्निशमन दलाचा एक बंब घटनास्थळी दाखल होवून आग आटोक्यात आणली. आग वेगाने पसरत गेल्यास आजूबाजूसह वरच्या मजल्यावरील दुकानानाही झळ बसली असती, परंतु अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आगीवर ताबा मिळविल्याने पुढील अनर्थ टळला.
मात्र, ऑटोमोबाईल दुकानातील साहित्य जळून खाक झाल्याने व्यापार्याचे मोठे नुकसान झाले आहे. आग कशामुळे लागली याचा शोध पोलीस यंत्रणा घेत आहे. आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी.असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सोमवारी सकाळी महसुल विभागाच्या वतीने पंचनामा करण्यात आला. आगीत अंदाजे तेरा लाख रुपयांचे दुकानातील साहित्य व फर्निचर जुळून खाक झाले आहे, अशी माहिती अंबाजोगाईचे तलाठी मुळे यांनी दिली.