अवाचे सवा भाडे; छेडछाड अन् राजरोस दादागिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:12 AM2021-09-02T05:12:34+5:302021-09-02T05:12:34+5:30

बीड: चालकाच्या छेडछाडीला वैतागून तरुणीने धावत्या रिक्षातून उडी घेतल्याचा प्रकार औरंगाबादेत घडला होता. बीडमध्येही महिला, मुलींचा रिक्षाप्रवास सुरक्षित ...

Ava's quarter fare; Annoyingly Libran - always rational, easily hurt emotionally, very passionate and maybe a little too intense | अवाचे सवा भाडे; छेडछाड अन् राजरोस दादागिरी

अवाचे सवा भाडे; छेडछाड अन् राजरोस दादागिरी

Next

बीड: चालकाच्या छेडछाडीला वैतागून तरुणीने धावत्या रिक्षातून उडी घेतल्याचा प्रकार औरंगाबादेत घडला होता. बीडमध्येही महिला, मुलींचा रिक्षाप्रवास सुरक्षित नसल्याची माहिती समाेर आली आहे. अवाचे सवा भाडे, छेडछाड तसेच राजरोस गुंडागर्दी याहून वेगळे चित्र नाही. औरंगाबादेतील घटनेने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, रिक्षाचालकांच्या मनमानीला लगाम कोण घालणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शहरात परवानाधारक रिक्षाचालकांपेक्षा विनापरवाना रिक्षाचालकांच्या बाबतीत तक्रारी अधिक आहेत. मुंबई,औरंगाबाद येथील कालबाह्य रिक्षा बीडमध्ये आणून कुठल्याही परवानाशिवाय चालविल्या जातात. परवानाधारक रिक्षांवर पिवळ्या रंगाची पट्टी असते. मात्र, अनेक विनापरवाना रिक्षांवर अशा पिवळ्या पट्ट्या पाहायास मिळतात. काही रिक्षाचालक दारू, गांजासारखी व्यसने करतात. त्यांच्याकडून महिला, मुलींची छेडछाड होते. काही जण अश्लील गाणे लावून तसेच कमेंट करून गैरवर्तन करतात. दरम्यान, विनापरवाना रिक्षाचालकांसोबत काही वाहतूक पाेलिसांची हातमिळवणी आहे. त्यामुळे त्यांचे फावत आहे. विनापरवाना रिक्षाचालकांमुळे होणाऱ्या अन्यायाविरुध्द वारंवार निवेदने देऊन, आंदोलने करूनही ठोस कारवाई होत नाही, असा आरोप जिल्हा परमिट मालक -चालक ऑटो संघटनेचे संस्थापक अरुण कळसकर यांनी केला आहे.

....

या घटनांना जबाबदार कोण?

-प्रवासी भरण्यावरून वादावादी

शहरात अनधिकृत रिक्षाथांबे मोठ्या प्रमाणावर आहेत. तेथे रिक्षांच्या भररस्त्यात रांगा असतात. प्रवाशांची खेचाखेची होते. यातून अनेकदा रिक्षाचालकांमध्येही वाद होतात. यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होण्याची शक्यता असते. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होते. अशा घटना आता नित्याच्या झाल्या आहेत.

- पोलिसाला लुटले

शहराजवळील पालवण रोडवर दोन वर्षांपूर्वी एका पोलीस अंमलदाराची दुचाकी रात्रीच्या वेळी अडवून मारहाण करत लुटल्याची घटना घडली होती. शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नाेंद झाला होता. पोलिसांनी रिक्षाचालकाचा शोध घेऊन त्यास बेड्या ठोकल्या होत्या. पोलिसांवर हात उचलण्यापर्यंत रिक्षाचालकांची मजल गेल्याचे यातून समोर आले होते.

...

विनापरवाना रिक्षाचालकांचा सगळ्यांनाच ताप

- विनापरवाना रिक्षाचालकांमुळे शासनाचा महसूल तर बुडतोच; पण परवानाधारक रिक्षाचालकांसह वाहतूक पोलीस व सामान्य नागरिकांनाही त्रास होतो.

- कुठल्याही परवान्याशिवाय रिक्षा रस्त्यावर धावत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडते. प्रवाशांकडून जादा भाडे वसूल केेले जाते. भाड्यावरून वादविवादही होतात.

- विनापरवाना रिक्षाचालक हे परवानाधारक रिक्षाचालकांशी स्पर्धा करतात. परवानाधारक रिक्षाचालक प्रामाणिकपणे कर भरतात; पण विनापरवाना रिक्षाचालक कर न भरता पैसे कमावतात.

- विनापरवाना रिक्षाचालकांची कोठे नोंदही नसते. त्यामुळे काही अनपेक्षित घटना घडल्यास त्यांचा शोध लावणेदेखील कठीण होऊन बसते.

...

काय काळजी घेणार?

महिला, मुलींनी रिक्षातून प्रवास करताना योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. ज्या रिक्षातून प्रवास करावयाचा आहे त्याचा क्रमांक शक्यतो लक्षात ठेवावा. रिक्षाचालक छेड काढत आहे, असे वाटल्यास तत्काळ

पोलिसांची मदत घ्यावी. १०९१ या हेल्पलाइन क्रमांकावर तसेच नजीकच्या पोलीस ठाण्याशीही संपर्क करता येईल. ज्येष्ठ नागिरकांनी प्रवासात मौल्यवान वस्तू सांभाळाव्यात, आवश्यक तेथे पोलिसांचे साहाय्य घ्यावे.

- भागवत फुंदे, पोलीस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा, बीड

...

विनपरवाना रिक्षाचालकांवर कारवाईसंदर्भात नियोजन सुरू आहे. यापूर्वीही काही कारवाया झालेल्या आहेत. परवाना नूतनीकरण नसलेले तसेच कालबाह्य वाहने रस्त्यावर धावत असल्याचे निदर्शनास आल्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.

-संदीप खडसे, सहाय्यक उपप्रादेशिक

परिवहन अधिकारी, बीड

....

२०००

शहरातील परवानाधारक रिक्षाचालक

१०००

परवाना नसलेले रिक्षाचालक

....

Web Title: Ava's quarter fare; Annoyingly Libran - always rational, easily hurt emotionally, very passionate and maybe a little too intense

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.