तहसीलच्या आवारात घुमला टाळ, संबळचा आवाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:32 AM2021-05-16T04:32:49+5:302021-05-16T04:32:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क धारूर : भिक्षुकी करून पोट भरणारे, पारंपरिक व्यवसाय करणारे वासुदेव व गोंधळी समाजावर कोरोना लॉकडाऊनमुळे उपासमारीची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
धारूर : भिक्षुकी करून पोट भरणारे, पारंपरिक व्यवसाय करणारे वासुदेव व गोंधळी समाजावर कोरोना लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आली आहे. या समाजाला प्रशासनाने अन्नधान्य व आर्थिक मदत करावी, अशी मागणी समाजबांधवांनी तहसीलदारकडे एका निवेदनाद्वारे केली. शनिवारी पांरपरिक वेषात येऊन तहसील आवारात टाळ, संबळ वाजवून आंदोलन केले. यावेळी वाद्यांच्या आवाजाने तहसील परिसर दणाणून गेला होता.
धारूर तालुका व शहरातील वासुदेव समाज व गोंधळी समाजाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन दिले. या समाजाची उपजीविका भिक्षुकीवर आहे. मंदिरात किंवा प्रत्येकाचे घरासमोर जाऊन गीत म्हणत टाळ, संबळचा आवाज करीत, कुळाचा उद्धार करीत भिक्षा मागून उपजीविका चालते. मात्र, कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन महिन्यापासून पडणाऱ्या लॉकडाऊनमुळे या भिक्षा मागन्ऱ्या समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. या समाजाला प्रशासनाने अन्नधान्य व इतर काही मदत करावी, अशी मागणी या समाज बांधवांनी तहसीलदारकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनावर बलभीम आडसूळ, रामकिसन वानरे, अशोक सोनवणे, अशोक अडसूळ, रमेश कटक, रमेश सोनवणे, गणेश सोनवणे, आशाराम वानरे, बालाजी भंगाडे, शिवाजी भंगाडे, शंकर भंगाडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
===Photopath===
150521\img_20210515_113458_14.jpg