नाळवंडीला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छतेचा पुरस्कार प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:29 AM2021-02-05T08:29:33+5:302021-02-05T08:29:33+5:30
बीड : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता स्पर्धेत २०१८-१९ मध्ये सहभाग घेणाऱ्या नाळवंडीला जिल्ह्यातून द्वितीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. एक वर्षात ...
बीड : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता स्पर्धेत २०१८-१९ मध्ये सहभाग घेणाऱ्या नाळवंडीला जिल्ह्यातून द्वितीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. एक वर्षात दोन वेळा गावाला लौकिक व सन्मान प्राप्त झाला. पालकमंत्री धनंजय मुंडे, आ. संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, सीईओ अजित कुंभार , पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी, आ.संजय दौंड यांच्या हस्ते संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता स्पर्धेचा पुरस्कार गावाने स्वीकारला. यावेळी सरपंच राधाकिसन म्हेत्रे, ग्रामसेवक भाऊसाहेब मिसाळ, ग्रामसेवक भगवान तिडके, उपसरपंच अरुण तम्बरे, सदस्य सलीम बागवान, संतोष वाघमारे, पं. स. सदस्य उत्तरेश्वर सोनवणे,श्रीहरी राऊत, नामदेव म्हेत्रे आदी उपस्थित होते.
निजामकाळात जहागिरी असलेले हे गाव जिल्ह्यात आदर्श म्हणून मान्य झाले आहे. हा पुरस्कार माझा नसून गाव आणि गावच्या मातीचा आहे. ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी, स्वच्छतासेवक व अबालवृद्धांचा हा सन्मान आहे. हा सन्मान केवळ माझा ग्रामपंचायत सदस्य अथवा विशिष्ट गटाचा नाही तर ज्याच्या मतदानकार्डवर नाळवंडी नाव आहे, त्या सर्वांचा आहे. नाळवडीकरांच्या लोकसहभागातून अवघ्या २ वर्षांत जिल्ह्यातून बहुमान मिळाल्याचा आनंद आहे. फक्त पुरस्कारासाठी काम न करता सातत्याने लोकांच्या सहकार्यातून यापेक्षा जास्त काम करणार असल्याचे सरपंच राधाकिसन म्हेत्रे यांनी सांगितले.