गोरख सोनवणे यांना विद्यावाचस्पती पदवी प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:38 AM2021-08-13T04:38:15+5:302021-08-13T04:38:15+5:30

सिरसाला : येथील श्री पंडित गुरु पार्डीकर महाविद्यालयाचे सैनिकशास्त्र विभागाचे साहाय्यक प्रा. जी. एन. सोनवणे यांना नांदेड येथील स्वामी ...

Awarded Vidyavachaspati degree to Gorakh Sonawane | गोरख सोनवणे यांना विद्यावाचस्पती पदवी प्रदान

गोरख सोनवणे यांना विद्यावाचस्पती पदवी प्रदान

Next

सिरसाला : येथील श्री पंडित गुरु पार्डीकर महाविद्यालयाचे सैनिकशास्त्र विभागाचे साहाय्यक प्रा. जी. एन. सोनवणे यांना नांदेड येथील स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाने सैनिकशास्त्र विषयाअंतर्गत ‘दक्षिण आशियातील भारताविषयी चीनची लष्करी व सामरिक व्यूहरचना : एक विश्लेषणात्मक अभ्यास’ या शीर्षकांतर्गत शोधप्रबंध स्वीकारून त्यांना ‘विद्यावाचस्पती’ पदवी प्रदान केली.

परभणी येथील शिवाजी महाविद्यालयाचे सैनिकशास्त्र विषयाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. चंद्रकांत भांगे यांच्या संशोधन, मार्गदर्शनांतर्गत संशोधन कार्याचा शोधप्रबंध विद्यापीठास सादर केला होता. स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाने सैनिकशास्त्र विषयात डॉ. चंद्रकांत भांगे यांच्या मार्गदर्शनाखाली गोरख सोनवणे यांना विद्यापीठाने सर्वप्रथम विद्यावाचस्पती पदवी प्रधान केली. त्यांच्या या यशाबद्दल रामेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व्यंकटरावजी कदम, उपाध्यक्ष नंदकुमार सारडा, सचिव डॉ. जी.व्ही. गट्टी, सर्व संचालक मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच.पी. कदम, सिनेट सदस्य आ. प्रोफेसर डॉ. एम.बी. धोंडगे, सैनिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. के.एम. नागरगोजे यांच्यासह सर्व सहकारी व शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

Web Title: Awarded Vidyavachaspati degree to Gorakh Sonawane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.