धनगरजवळका येथे कृषीचा जनजागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:16 AM2021-01-24T04:16:00+5:302021-01-24T04:16:00+5:30
या कार्यक्रमात शेतकऱ्यांना तज्ज्ञ व अभ्यासकांच्या माध्यमातून कमी खर्चातील विषमुक्त शेतीचे मार्गदर्शन केले जाते. कृषी व जोड व्यवसाय ...
या कार्यक्रमात शेतकऱ्यांना तज्ज्ञ व अभ्यासकांच्या माध्यमातून कमी खर्चातील विषमुक्त शेतीचे मार्गदर्शन केले जाते. कृषी व जोड व्यवसाय तसेच सामाजिक उपक्रमांतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचे विना हुंडा लग्न लावणे. ग्रामविकासासाठी सरपंचाचे सुध्दा प्रबोधन करण्यात येते. यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हा कार्यक्रम रद्द करून महाराष्ट्रासह परराज्यात, २८ जानेवारी २०२१ पर्यंत ११०० ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर जागतिक कृषी महोत्सव सप्ताह घेण्याचे नियोजन करप्यात आले.
धनगर जवळका येथे सुद्धा २४ जानेवारी रोजी एक दिवसीय कृषी महोत्सव सप्ताहात कृषी विषयासोबत भारत व कृषी संस्कृती, पशुधन व गोवंश, दुर्मीळ वन औषधी, बी-बियाणे, पर्यावरण, शेतीवर आधारित जोड व्यवसाय, स्वयंरोजगार, शेतकऱ्यांच्या मुला-मुलींसाठी विवाहासाठी सुयोग्य स्थळाची माहिती, आरोग्य इत्यादी विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन जागतिक कृषी महोत्सव सप्ताह २०२१ आयोजन समितीने केले आहे.