मास्क वापराबाबत जनजागृती मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:30 AM2021-05-22T04:30:44+5:302021-05-22T04:30:44+5:30

हातावर पोट असणाऱ्यांना मदत द्या बीड : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालल्याने लॉकडाऊनच्या धर्तीवर अनेक उद्योग, व्यवसाय बंद आहेत. परिणामी ...

Awareness campaign on the use of masks | मास्क वापराबाबत जनजागृती मोहीम

मास्क वापराबाबत जनजागृती मोहीम

Next

हातावर पोट असणाऱ्यांना मदत द्या

बीड : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालल्याने लॉकडाऊनच्या धर्तीवर अनेक उद्योग, व्यवसाय बंद आहेत. परिणामी अनेकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. अनेक हातावर पोट असणाऱ्या घटकांना शासकीय मदतीची नितांत आवश्यकता आहे. जे बेरोजगार आहेत. त्यांना आर्थिक मदत करा, अशी मागणी नागरिक, मजूर वर्गांमधून केली जात आहे.

यात्रा, उत्सवांना कोरोनाचा फटका

अंबाजोगाई : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून अंबाजोगाई तालुक्यातील सर्व यात्रा, जत्रा, उत्सव, समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा असे सर्व गर्दी होणारे कार्यक्रम शासनाच्या वतीने बंद ठेवण्यात आले आहेत. मार्च महिन्यांपासून ग्रामीण भागात गावोगावी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते, तर सर्वच यात्रा मोठ्या प्रमाणात असतात. अनेकांचे अर्थकारण या यात्रांवरच असते. यात्रा, उत्सव बंद ठेवल्याचा मोठा फटका ग्रामीण भागातील अर्थकारणावर होणार आहे.

राडी-मुडेगाव रस्त्यावर मोठे खड्डे

अंबाजोगाई : आठ महिन्यांपूर्वीच राडी ते मुडेगांव या मुख्य रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. शासनाने लाखो रुपये खर्च करून या रस्त्याचे डांबरीकरण केले. मात्र, काम करणाऱ्या कंत्राटदाराने या मुख्य रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे केल्याने या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. हा रस्ता कंत्राटदारांच्या माध्यमातून पुन्हा करण्यात यावा, अन्यथा त्या कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणी मुडेगाव येथील ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: Awareness campaign on the use of masks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.