भयंकर ! तरुणाला वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने बोलावले अन पेट्रोल टाकून पेटवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 03:46 PM2021-09-23T15:46:06+5:302021-09-23T16:15:22+5:30
Crime in Beed : नाकलगावच्या युवकाला धारूर घाटात पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न.
धारूर : मित्राचा वाढदिवस साजरा करायचा आहे, तू रस्त्यावर ये,असे असे म्हणत फूस लावून बोलावून नाकलगावच्या 19 वर्षीय युवकाला मारहाण करून धारूर ते सोनीमोहा रस्त्यावरील घाटात नेण्यात आले. त्यानंतर त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज पहाटे घडली.दरम्यान चार जणांविरुद्ध दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कृष्णा अर्जुन गायकवाड वय 19 वर्षे राहणार नाकलगाव. हा बुधवार दि. 21 रोजी रात्री साडेआठ वाजता आपल्या गावातील किराणा दुकाना समोर थांबला होता.त्यावेळी त्याचा मित्र आदिनाथ सुधाकर गायकवाड याचा फोन आला.आपल्याला मित्राचा वाढदिवस साजरा करायचा आहे.तू रस्त्यावर ये,कृष्णा आदिनाथ च्या बोलण्यावरून वाढदिवस साजरा करण्यासाठी रस्त्यावर गेला.त्यावेळी आदिनाथ व त्याच्यासोबत असणाऱ्या इतर 4 लोकांनी कृष्णाला शिवीगाळ करत बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. पोत्यात टाकून चारचाकी वाहनातुन सोन्निमोहा ते धारूर घाटाच्या परिसरात गाडीतून फेकून दिले.
हेही वाचा - औरंगाबादमध्ये ऑनर किलिंग ? वडिलांनीच खड्डा खोदून पुरला मुलीचा मृतदेह
यावेळी कृष्णाला त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत मारण्याच्या उद्देशाने पेटवून देऊन ते चार जण निघून गेले. यावेळी काही वेळाने बेशुद्ध अवस्थेत असलेल्या कृष्णाला जवळील वस्तीवरच्या लोकांनी आपल्या वस्तीवर आणून जखमी कृष्णाच्या नातेवाईकांना फोन करून सदरील घटनेची माहिती दिली.दरम्यान कृष्णावर अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे.कृष्णाचे चुलते भीमराव निवृत्ती गायकवाड यांच्या फिर्यादीवरून आरोपी आदिनाथ सुधाकर गायकवाड व इतर तीन अनोळखी व्यक्ती विरोधात गुर 197/ 2021 भा.द.वि.307,365,342 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपी फरार आहेत. प्रकरणाचा पुढील तपास स.पो.नि. प्रभा पुंडगे या करत आहे. दरम्यान या प्रकाराने परिसरात दहशतीचे वातावरण आहे.
हेही वाचा - शिवणगावजवळ मालगाडीचे डबे रुळावरून उतरले; प्रवासी रेल्वे वाहतूक खोळंबली