बीडमध्ये १७५६ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर कुऱ्हाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:39 AM2021-09-14T04:39:51+5:302021-09-14T04:39:51+5:30
२) १० सप्टेंबर २०२१ पर्यंत कमी केलेले कर्मचारी - १७५६ जिल्हा - बीड कमी केलेले एकूण कर्मचारी - १७५६ ...
२) १० सप्टेंबर २०२१ पर्यंत कमी केलेले कर्मचारी - १७५६
जिल्हा - बीड
कमी केलेले एकूण कर्मचारी - १७५६
डॉक्टर - ८६
नर्स - २७४
शिपाई - ४२५
इतर - ९७१
---
३) हे कर्मचारी कमी केल्यामुळे रुग्णसेवेवर काय परिणाम झाला?
जागतिक आरोग्य संस्थेच्या सूचनेनुसार साध्या चार खाटांमागे १ व आयसीयूमध्ये एका खाटेमागे एक परिचारिका असावी, असा नियम आहे. बीडमध्ये सद्य:स्थितीत २५ ते ३० खाटांमागे एक परिचारिका आहे. तसेच १४४ खाटांमागे केवळ ५ डॉक्टर आहेत.
रुग्णांना वेळेवर सुविधा व उपचार मिळत नाहीत.
आवाज दिल्याबरोबर सेवा मिळत नाही
नातेवाईक व आराेग्य कर्मचाऱ्यांमधील वाद वाढले
अस्वच्छता वाढली
तक्रारीही वाढत आहेत.
--
४)कमी केलेल्या कर्मचाऱ्यांपैकी एखाद्याचा कोट
................................................मी एमपीएससीचा अभ्यास करत होतो; परंतु अभ्यासिका बंद झाली. परिस्थिती हालाखीची असल्याने गावाकडे जाऊन तरी काय करणार. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात रुजू झालो; परंतु आता आम्हाला कमी केल्याने अडचण झाली आहे. आमचे वेतनही अद्याप दिलेले नाही.
पांडुरंग काळे, बीड
---
५) कमी केलेल्या कर्मचाऱ्यांपैकी एखाद्याची केसस्टडी -
- गेवराई तालुक्यातील एक मुलगा दुकानात काम करत होता. लॉकडाऊनमुळे दुकान बंद झाले. म्हणून तो बीडला येऊन जिल्हा रुग्णालयात वॉर्डबॉय म्हणून रुजू झाला. रुग्णसंख्या कमी झाल्याने त्यालाही कमी करण्यात आले. आगोदर दुकानातून नोकरी गेली आणि आरोग्य विभागानेही हातात नारळ दिले. त्यामुळे त्याच्यावर कोरोनामुळे दोन वेळा बेरोजगारी आली आहे. हा तरुण २८ वर्षांचा आहे.
---
६) कामावरून कमी केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी - पॉइंटर स्वरूपात
जून व ऑगस्ट महिन्याचे वेतन अद्याप नाही
उसनवारी करून नोकरीला आले, आता पगार नाही. उसनवारीचे पैसे कसे परत करणार, असा प्रश्न
आगोदरचे काम सोडून रुग्णालयात आले, आता इकडचे काम गेल्याने पहिल्या मालकानेही कामावर घेण्यास नकार दिला
विवाहितांना काम मिळत नसल्याने संसार भागविणे जड जात आहे.
---
७) जिल्हा आरोग्य अधिकारी किंवा तत्सम अधिकाऱ्याचा कोट
आम्हाला वरिष्ठांकडून आदेश मिळाल्याने मनुष्यबळ कमी केले. सध्या नियमित व कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून उपचार केले जात आहेत. तसेच थकीत वेतन देण्याबाबतही कार्यवाही सुरू आहे.
डॉ. सुरेश साबळे, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड