आष्टीच्या बी. फार्मसी कॉलेजचे जीपॅटमध्ये यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:31 AM2021-03-28T04:31:31+5:302021-03-28T04:31:31+5:30
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फार्मसी क्षेत्रामध्ये नामवंत व यशस्वी होण्यासाठी फार्मसी क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी भीमसेन धोंडे यांनी डी. ...
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फार्मसी क्षेत्रामध्ये नामवंत व यशस्वी होण्यासाठी फार्मसी क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी भीमसेन धोंडे यांनी डी. फार्मसी व बी.फार्मसी महाविद्यालयांची २०१६ पासून सुरुवात केली. मागील वर्षी पाच विद्यार्थ्यांनी व या वर्षीही विद्यार्थ्यांनी पदवीधर फार्मसी अभियोग्यता चाचणी (जीपॅट) व राष्ट्रीय औषध शिक्षण संशोधन संस्था (नायपर) या परीक्षांमध्ये यश संपादन केले.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन माध्यमांचा उपयोग करूनच मार्गदर्शन करावे लागले. भव्य ग्रंथालय, नियमित होत असलेले अभ्यासिका व प्रात्यक्षिक, बाह्य शिक्षकांची गेस्ट लेक्चर, कॉलेजच्या शिक्षकांचे मार्गदर्शन या सर्व बाबींमुळे हे यश संपादन करता आल्याचे प्राचार्य सुनील कोल्हे यांनी सांगितले. जीपॅट परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भीमसेन धोंडे ,संचालक अजय धोंडे, अभय धोंडे तसेच प्रशासकीय अधिकारी डॉ. डी. बी. राऊत, शिवदास विधाते, दत्तात्रय गिलचे, माऊली बोडखे, शिवाजी वनवे, संजय शेंडे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
===Photopath===
270321\27bed_11_27032021_14.jpg