'बाबासाहेब आगे मला भावा समान'; आरोपीच्या पत्नीने हत्येचं कारण उघड केलं, म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 16:47 IST2025-04-19T16:46:57+5:302025-04-19T16:47:17+5:30

Babasaheb Aage Murder Case: दारूच्या व्यसनातून निर्माण झालेला संशय ठरला खूनाला कारण; पतीच्या विकृत मानसिकतेचा बळी ठरले बाबासाहेब आगे

'Babasaheb Aage is like a brother to me'; Accused's wife reveals reason for murder, says... | 'बाबासाहेब आगे मला भावा समान'; आरोपीच्या पत्नीने हत्येचं कारण उघड केलं, म्हणाल्या...

'बाबासाहेब आगे मला भावा समान'; आरोपीच्या पत्नीने हत्येचं कारण उघड केलं, म्हणाल्या...

बीड: किटी आडगाव येथील भाजप पदाधिकारी आणि ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब आगे यांची माजलगाव मध्ये भरदिवस झालेली क्रूर हत्या आता वेगळ्या कारणांमुळे चर्चेत आली आहे. या हत्येचे खरे कारण आरोपी नारायण फपाळ याच्या पत्नीने सांगितले आहे. याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून आरोपीची पत्नी यांनी ही घटना केवळ दारूचे व्यसन असलेल्या पतीच्या संशयीवृत्तीमधून झाली असल्याचे म्हंटले आहे.

आरोपी नारायण फपाळ याच्या पत्नीने सांगितले की, पतीला दारूचे व्यसन होते, त्यातच तो संशयीवृत्तीचा होता. सातत्याने चारित्र्यावर संशय घेत असे. त्याचे शिव्या देऊ मारहाण करणे, गावातील इतर पुरुषांबद्दल शंका घेणे, हे त्याचं रोजचंच झालं होतं. बाबासाहेब आगे मला भावा समान होते. केवळ मदतीच्या हेतूने त्यांनी नेहमी सहकार्य केलं होतं. मात्र, बाबासाहेब यांच्याबद्दलही मनात संशय निर्माण झाला आणि यातूनच  पती नारायण फपाळ याने अमानुषपणे खून केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ही घटना भाजपा तालुका सरचिटणीस बाबासाहेब आगे हे माजलगाव येथे भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण राऊत यांची भेट घेण्यासाठी शाहू नगर येथील कार्यालयात गेले असताना मंगळवारी ( दि. १५ ) दुपारी घडली. आगे कार्यालयाच्या बाहेर पडताच दबा धरून बसलेल्या नारायण फपाळ याने शर्टमध्ये लपवलेला कोयता बाहेर काढत अचानक हल्ला केला. वार चुकवून आगे पुढे पळाले. पण फपाळ याने त्यांना काही अंतरावर गाठून कोयत्याचा वार केला. काही क्षणांत बाबासाहेब आगे रक्तबंबाळ होऊन कोसळले. त्यानंतर फपाळ याने पुन्हा अनेक वार केले. हल्ल्यानंतर नारायण फपाळ थेट माजलगाव पोलीस ठाण्यात गेला आणि खुनाची कबुली दिली.

पंकजा मुंडे यांनी कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली
दरम्यान, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत बाबासाहेब आगे यांना “धडाडीचा कार्यकर्ता” अशी श्रद्धांजली वाहिली. त्यांनी आगे कुटुंबीयांची पुढील जबाबदारी स्वीकारण्याचा निर्णय घेतला असून, आज दुपारी त्या माजलगाव येथे जाऊन आगे कुटुंबीयांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.

Web Title: 'Babasaheb Aage is like a brother to me'; Accused's wife reveals reason for murder, says...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.