बाळ वारंवार डायपर ओले करतेय; तातडीने डॉक्टरांना दाखवा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:20 AM2021-07-23T04:20:59+5:302021-07-23T04:20:59+5:30
बीड : एक महिन्यापासून ते १८ वर्षांपर्यंतच्या मुलांना टाईप १ डायबिटीज आजार होतो. परंतु, मातांना याची जास्तच माहितीच नसते. ...
बीड : एक महिन्यापासून ते १८ वर्षांपर्यंतच्या मुलांना टाईप १ डायबिटीज आजार होतो. परंतु, मातांना याची जास्तच माहितीच नसते. त्यामुळे बाळ वारंवार डायपर ओले करत असेल, तर तत्काळ बालरोगतज्ज्ञांना दाखवा. बाळाकडे दुर्लक्ष करू नका. बालकांना चांगला व ठरावीक आहार देऊन त्यांच्याकडून व्यायाम करून घ्या.
आई-वडिलांना डायबिटीज असेल तर...
घरात रक्ताच्या नात्यातील कोणाला डायबिटीज असेल तर त्यापासून लहान मुलांना होण्याची शक्यता असते. त्यामुळे पालकांनी मुलांच्या आजाराकडे दुर्लक्ष करू नये. त्यांचा सांभाळ करणे जेवढे अवघड असते तेवढेच उपचार करणेही आव्हानात्मक असते.
काय आहेत लक्षणे
n तहान जास्त लागणे, लघवी लागणे
n अचानक वजन कमी होणे
n चिडचिडेपणा, जास्त भूक लागणे
काळजी काय घ्यावी
n तत्काळ तपासणी करावी, जेवढ्या लवकर निदान करतात, तेवढी पुढे गुंतागुंती होणार नाही. ठरावीक आहार देऊन व्यायाम करावा
--
टाईप १ डायबिटीज हा आजार एक आजार आहे. १ महिन्याच्या पुढील बाळांना हा होतो. वेळीच निदान होणे गरजेचे आहे, अन्यथा ह्रदय, किडनी, डोळ्यांवर परिणाम होऊन हाडांची झीज होण्याची शक्यता असते. त्यासाठी बाळांकडे दुर्लक्ष न करता तत्काळ तपासणी करावी.
- डॉ. सचिन आंधळकर, बालरोगतज्ज्ञ बीड.
220721\22_2_bed_16_22072021_14.jpg
डॉ.सचिन आंधळरक, बालरोग तज्ज्ञ बीड