अंबाजोगाईत फळे, भाजी विक्रेत्यांची अँटिजन टेस्टकडे पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:27 AM2021-05-03T04:27:37+5:302021-05-03T04:27:37+5:30
अंबाजोगाई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अंबाजोगाई शहरातील फळे विक्रेते व भाजी विक्रेते यांची अँटिजन टेस्ट करणाचे आवाहन नगर परिषदेचे ...
अंबाजोगाई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अंबाजोगाई शहरातील फळे विक्रेते व भाजी विक्रेते यांची अँटिजन टेस्ट करणाचे आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी रस्त्यावर उतरून केले होते. तरीही विक्रेत्यांनी अँटिजन टेस्ट करण्याकडे पाठ फिरविली आहे.
अंबाजोगाई शहर सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. एप्रिल महिन्यात २४ दिवसांत अंबाजोगाई तालुक्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात निष्पन्न झाले आहेत. अशा स्थितीवर मात करून उपाययोजना करण्यासाठी अंबाजोगाई शहरात सार्वजनिक ठिकाणी फळे व भाजीपाला विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची अँटिजन टेस्ट करून कोरोनाचे सुपर स्प्रेडरपासून प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपालिका व महसूल प्रशासनाच्या वतीने विक्रेत्यांची अँटिजन टेस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रशासनाच्या आवाहनानंतर विक्रेते स्वतःची अँटिजन टेस्ट करून घेतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र, तीही फोल ठरली. आता पुन्हा या विक्रेत्यांना आवाहन करून अँटिजन टेस्ट करण्यासाठी प्रवृत्त केले जाणार आहे.